'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' अभियानांतर्गत होणार विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:18 PM2020-09-15T12:18:52+5:302020-09-15T12:19:17+5:30
राज्यस्तरावर पहिले बक्षीस १० हजार , दुसरे बक्षीस पाच हजार आणि तीसरे बक्षीस ३ हजार रुपये ठेवण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानांतर्गंत वैयक्तीक आणि संस्थांसाठी बक्षीस योजना राबविण्यात येणार आहे. वैयक्तीकसाठी निबंध , पोस्टर्स, शॉर्ट फिल्म, आरोग्य शिक्षण मॅसेज आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच वेगवेगळ््या संस्थाच्या कामकाजानुसार बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्ये राज्यस्तरावर पहिले बक्षीस १० हजार , दुसरे बक्षीस पाच हजार आणि तीसरे बक्षीस ३ हजार रुपये ठेवण्यात आले आहे.
्नराज्य शासनाच्या वतीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेतील विजेत्यांना विधानसभा मतदार संघ ते राज्य स्तरावर बक्षीसे देण्यात येणार आहेत. वैयक्तीक बक्षीसासाठीचे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावे लागणार आहे. त्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. आलेले साहित्य तपासूण त्यांना गुणानुकमांक देण्यासाठी जिल्हाधिकारी स्थानिक स्तरावर समिती नेमणार आहेत.ही समिती गुणानुक्रमांक निश्चित करणार आहेत. वैयक्तीक बक्षीसे विद्यार्थी, पालक व सामान्य व्यक्ती यांच्यासाठी असणार आहे. स्पर्धेसाठी प्राप्त झालेले निबंध, पोस्टर्स, फिल्मस यांना राज्य शासनाच्यावतीने प्रसिद्धी देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील विजेत्यांना ढाल व रोख पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
असे मिळतील पुरस्कार
निवड समितीद्वारे वैयक्ती आणि संस्थांसाठीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. यामध्ये राज्य स्तरार पहिले बक्षीस १० हजार , दुसरे पाच हजार आणि तिसरे तीन हजार रुपये तर जिल्हास्तरावर पहिले पाच हजार, दुसरे तीन हजार आणि तिसरे दोन हजार रुपये , महानगर पालिका स्तरावर प्रथम पाच हजार ,दुसरे तीन हजार , तिसरे दोन हजार रुपये , मतदार संघात प्रथम तीन हजार, द्वितीय दोन हजार तर तृतीय एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.