विविध राजकीय पक्षांचा एसटी कर्मचारी संपास पाठींबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 01:31 PM2017-10-20T13:31:23+5:302017-10-20T13:31:51+5:30

Various political parties support'ST employees' strike | विविध राजकीय पक्षांचा एसटी कर्मचारी संपास पाठींबा

विविध राजकीय पक्षांचा एसटी कर्मचारी संपास पाठींबा

googlenewsNext

चिखली : सातवा वेतन आयोग लागु करावा यासह विविध न्याय मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी १६ आॅक्टोंबर च्या मध्यरात्री पासून पुकारलेल्या संपास विविध राजकीय पक्षांनी आपला पाठींबा दर्शविला असून या स्थानिक चिखली आगारातील संपकरी कर्मचाºयांची भेट घेवून शासनाने त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात व कर्मचाºयांसह प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटना 
येथील आगरात संप पुकारलेल्या एस.टी.कामगारांची स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी १८ आॅक्टोबर रोजी भेट घेवून एस.टी.कर्मचाºयांचे प्रश्न जाणून घेतले. दरम्यान सरकारने एस.टी.कर्मचाºयांचे प्रश्न तात्काळ सोडवावे अन्यथा जनता सरकारच्या अंगावर जाईल, असा ईशारा तुपकरांनी यावेळी दिला. तसेच भाजपा सरकार अपयशी असल्याची टिका करून सरकारमधील मंत्र्यांचे बेताल वक्तव्य ही सरकारची मुजोरी असल्याचे स्पष्ट करून एस.टी. कर्मचाºयांच्या भावना समजून घेत तातडीने तडजोड करणे अपेक्षीत होते मात्र, तसे झाले नसल्याने या संपास रविकांत तुपकर यांनी पाठींबा जाहीर केला. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत वाघमारे, नितीन राजपूत, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख मुख्तार, संतोष राजपूत, चिखली संपर्क प्रमुख शाम अवतळे, जालना जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख पवन देशमुख, तालुकाध्यक्ष राम अंभोरे, अनिल वाकोडे, छोटू झगरे, रामेश्वर परिहार  आदी उपस्थित होते.


जिल्हा काँग्रेस कमिटी 
स्थानिक चिखली आगारातील दत्त मंदिर परीसरात आगारातील सर्व कर्मचाºयांनी संप पुकारून ठिय्या मांडला आहे. या संपकरी कर्मचाºयांची १८ आॅक्टोबर रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी भेट घेवून या आंदोलनास काँग्रेस पक्षाचा पाठींबा जाहीर केला व शासनाने तातडीने कर्मचाºयांच्या मागण्यांची पुर्तता करावी अशी मागणी केली. यावेळी काँग्रेस नेते प्रा.नरेंद्र खेडेकर, बाजार समितीचे सभापती डॉ़ सत्येंद्र भुसारी, समाधान सुपेकर, बाळु महाजन, तुषार भावसार, विलास चव्हाण आदी उपस्थित होते. दरम्यान शासनाच्या हेकेखोरपणामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होत आहेत, एस़टी. कर्मचाºयांनी वेळोवेळी केलेल्या मागण्यांकडे सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याने ही वेळ राज्यातील नागरीकांवर व प्रवाशांवर आली आहे, सरकारचा नाकर्तेपणा व हुकुमशाही वृत्तीच याला कारणीभूत असल्याचे परखड मत यावेळी आ.राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केले़ 


रासप व राजपूत युवा मंच 
महाराष्टÑ एस.टी.कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या बेमुदत संपास राष्टÑीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राजपूत युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष सुभाषसिंह राजपूत यांनी पाठींबा जाहीर केला असून चिखली आगरातील संपकरी कर्मचाºयांची भेट घेवून त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेत स्वत:चा जीव धोक्यात घालून अहोरात्र जनतेची सेवा करणाºया कर्मचाºयांच्या श्रमाचे योग्य मूल्य देण्याबाबत सरकार वेळकाढू धोरण अवलंबत असल्याने ही परिस्थिती उद्भवली असून ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी सरकारने कर्मचाºयांच्या मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी सुभाषसिंह राजपूत यांनी यावेळी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Various political parties support'ST employees' strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.