vidhan sabha 2019 : युतीचा गुंता; इच्छुकांच्या नजरा मुंबईकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 02:55 PM2019-09-23T14:55:35+5:302019-09-23T14:55:43+5:30

क्षणोक्षणी मिळणाऱ्या विविध स्वरुपाच्या माहितीच्या आधारावर जागा वाटपाचा युतीचा तिढा कितपत सुटला याचे आकलन करण्यावर भर दिला जात आहे.

vidhan sabha 2019: alliance complicity; Attention of aspirants towards Mumbai! | vidhan sabha 2019 : युतीचा गुंता; इच्छुकांच्या नजरा मुंबईकडे!

vidhan sabha 2019 : युतीचा गुंता; इच्छुकांच्या नजरा मुंबईकडे!

Next


नीलेश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: १४ व्या विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे सध्या मुंबईतील घडामोडींकडे लक्ष लागून आहे. त्यातच काही इच्छूक सध्या मुंबईतच ठाण मांडून असून क्षणोक्षणी मिळणाऱ्या विविध स्वरुपाच्या माहितीच्या आधारावर जागा वाटपाचा युतीचा तिढा कितपत सुटला याचे आकलन करण्यावर भर दिला जात आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघ हे युतीच्या ताब्यात असून तीन ठिकाणी भाजप तर दोन ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात तशी गतवेळी युती फार्मात होती. यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा कौल नेमका काय राहतो, याबाबत उत्सूकता कायम आहे.
गेल्या वेळी भाजपला सर्वाधिक २८ टक्के मते मिळाली होती तर सेनेला १९.२६ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे सात पैकी पाच विधानसभा मतदार संघामध्ये भाजप व शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. यात मलकापूरमध्ये, जळगाव जामोद आणि खामगावमध्ये भाजप तर मेहकर आणि सिंदखेड राजामध्ये शिवसेनेचा विजय झाला होता. या पृष्ठभूमीवर सध्या २०१९ मधील १४ व्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाची समिकरणे काय ठरतात याकडे राजकीय जाणकारांसह निवडणूक रिंगणात उतरू इच्छिणाऱ्यांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे मुंबईत २३ सप्टेंबर रोजी भाजपच्या पार्लमेंट्री बोर्डाची बैठक होत असल्याने बुलडाण्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळेंसह अनेक राजकीय नेते हे मुंबईत डेरेदाखल होणार आहे. त्यामुळे २३ सप्टेंबर रोजी मुंबईत राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या घडामोडी होणार असल्याचे संकेत मिळत आहे.
दुसरीकडे शिवसेनेमधील काही इच्छुकही सध्या मुंबईत डेरेदाखल असून मोतोश्री तथा शिवसेना भवनामध्ये होत असलेल्या बारिकसारीक हालचालीकडे त्यांचे लक्ष लागून आहे. येणाºया दोन ते तीन दिवसात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत जिल्ह्यातील राजकीय नेत्यांशी झालेल्या चर्चेतून समोर येत आहेत. त्यातच बुलडाण्याचे खासदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव हे ही मुंबईत उद्या पोहोचणार आहेत. शिवसेनेचीही २३ सप्टेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सुत्रांकडून समजते.


मेरीटमध्ये कोणता मतदारसंघ बसणार!
बुलडाणा जिल्ह्यात भाजप शिवसेना युतीमध्ये सात पैकी चार जागा भाजप आणि तीन जागा शिवसेनेकडे कायम राहत आल्या आहेत. यंदा बुलडाण्याच्या जागेवर भाजपने लोकसभेच्या जागे बदलात दावा केला आहे. त्यामुळे बुलडाण्याची जागा नेमकी कोणाला सुटणार याबाबत उत्सूकता आहे. जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान, संबंधित मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मते, प्रतिस्पर्ध्याला मिळालेली मते याचा विचार करून जागा नेमकी कोणाला सोडायची याचा मेरीट काढल्या जाण्याची शक्यता सुत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्यामुळे बुलडाण्याचा नेमका मेरीट काय ठरतो याकडे सध्या लक्ष लागून आहे.


शिवसेनाही बुलडाण्यासाठी आग्रही
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा चारदा आमदार राहलेला आहे. गेल्या वेळचा अपवाद वगळता बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व राहलेले आहे. त्यामुळे बुलडाण्याची जागा ही शिवसेनेलाच सुटणार असल्याचा दावा येथून निवडणूक लढवू इच्छिणाºयांनी केला आहे.


भाजपची संघटनात्मक ताकद वाढली
बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता येथे भाजपचे संघटन गतवेळपेक्षा मजबूत झाले आहे. शक्तीकेंद्र प्रमुख, पान प्रमुख यासह भाजपचे सक्रीय झालेले पदाधिकारी पाहता भाजपची फळी येथे मजबूत दिसते. त्यातुलनेत शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह अधिक असून तब्बल ३२ जण बुलडाण्यातून निवडणूकीसाठी इच्चूक असल्याचे समोर आले होते. त्यातच अमरावती विभागामध्ये भाजपच्या दृष्टीने जमेचा मतदारसंघ म्हणून बुलडाणा विधानसभेकडे पाहल्या जात आहे. त्यामुळे भाजपला बुलडाणा विधानसभा मतदार संघ सुटण्याची आशा भाजपातील इच्छुकांना आहे.

Web Title: vidhan sabha 2019: alliance complicity; Attention of aspirants towards Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.