डोणगाव : येथे गत काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
डोणगाव येथील विद्युतपुरवठा १५ व १६ जूनला दोन दिवस खंडित झाला होता़ त्यामुळे गावकरी व व्यापाऱ्यांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला हाेता़ तसेच विजेअभावी पाणीपुरवठाही प्रभावित झाला हाेता़ डोणगाव येथील विद्युतपुरवठा याेजनेला वीजपुरवठा करणारी केबल जीर्ण झाली असून लाेंबकळत आहेत़ तसेच वारंवार रोहित्रावरून विद्युतपुरवठा खंडित हाेण्याचा प्रकार वाढला आहे़ त्यामुळे पूर्वीप्रमाणे मालेगाव येथून डोणगाव सबस्टेशनला अतिरिक्त विद्युतपुरवठा घ्यावा, जेणेकरून मेहकरवरून विद्युतपुरवठा खंडित झाल्यास मालेगाववरून सुरळीत हाेईल तसेच डोणगाववासीयांना अखंड विद्युतपुरवठा मिळेल़ वारंवार खंडित हाेणाऱ्या वीजपुरवठ्यावर उपाययाेजना करण्याची मागणी पळसकर यांनी केली आहे़ मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा पळसकर यांनी निवेदनात दिला आहे़