लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: क्षुल्लक कारणावरून वाद होवून युवकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना स्थानिक रावणटेकडी भागातील घरकूल परिसरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंकज संजय देशमुख (२१) याने शिवाजीनगर पोस्टेला तक्रार दिली की, तो व त्याचा भाऊ रविवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास कामावरून घरी येत होते. दरम्यान घरकुलातील आखाड्याजवळ गणेश अल्लेपाग व त्याचा मावसभाऊ अनिकेत देशमुख यांच्यात भांडण सुरू होते. त्यावेळी तो भांडण सोडविण्यासाठी गेला असता गणेश याने शिविगाळ करून दगड मारला. यात पंकज जखमी झाला. या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश अल्लेपाग याच्याविरूध्द कलम ३२४, ५०४ भादवीनुसार गुन्हा दाखल केला. तर दुसºया बाजुने गणेश बलराज अल्लेपाग(२३) याने पोस्टेला तक्रार दिली की, रविवारी सायंकाळी रोहण गेडाम व पंकज देशमुख त्यांच्या घरासमोर आले. तसेच 'तू प्रविण सोबत का राहतो', असे म्हणून शिविगाळ केली. तसेच रोहण याने लोखंडी पाईप डोक्यावर व छातीवर मारून जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी रोहण गेडाम व पंकज देशमुख या दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
क्षुल्लक कारणावरून युवकांमध्ये हाणामारी; तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 11:18 AM