सामान्यांसाठी रेल्वे प्रवासाची प्रतीक्षा अद्यापही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 11:42 AM2021-07-01T11:42:28+5:302021-07-01T11:42:38+5:30

Buldhana News : रेल्वे प्रशासन  फायदा होणाऱ्या गाड्या स्पेशलच्या नावाखाली चालवत आहे.

The wait for the train journey for the commons is still on | सामान्यांसाठी रेल्वे प्रवासाची प्रतीक्षा अद्यापही कायम

सामान्यांसाठी रेल्वे प्रवासाची प्रतीक्षा अद्यापही कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: दुसऱ्या अनलॉकनंतर अनेक रेल्वे गाड्या सुरू झाल्या असल्या तरी काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्या आणि पॅसेंजर सुरु नाहीत. त्यामुळे नियमित स्वरुपात शासकीय, व्यावसायिक तथा अन्य कामासाठी ये-जा करणाऱ्यांची मोठी अडचण जात आहे. त्यामुळे या रेल्वे गाड्या नेमक्या कधी सुरू होतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोनाच्या पुर्वी ज्या रेल्वे गाड्या सुरू होत्या त्या आजही सुरू आहेत. परंतू गाडी क्रमांकाच्या अगोदर शुन्य लावून त्या विशेष रेल्वेगाड्या म्हणून चालविण्यात येत आहेत. त्या केवळ आरक्षीत जागांवरच प्रवेश दिल्या जात आहे. एका बोगीत ७२ शिट असतात तेथे आरक्षण झालेला व्यक्ती बसू शकतो. मात्र जनरलसाठी त्यात सुविधा नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे अनारक्षीत डबेही या गाड्यांना जोडण्यात येऊन सर्वच स्थानकावर त्या थांबविण्यात याव्यात अशी अपेक्षा प्रवाशी व्यक्त करत आहेत. यासाठी  लोकप्रतिनिधींनी केंद्र व राज्यस्तरावर आता आवाज उठविण्याची गरज आहे.

कोवीडच्या नावाखाली रेल्वे प्रशासन  फायदा होणाऱ्या गाड्या स्पेशलच्या नावाखाली चालवत आहे. अनारक्षीत डब्बे रद्द करून ते आरक्षीत केले आहे. विना आरक्षीत तिकीट देणे बंद आहे. त्यामुळे सर्व  स्थानकावर थांबणाऱ्या रेल्वे पॅसेंजर बंद आहेत.  याचा सामान्य प्रवाशांना मोठा त्रास  होतोय.
- ॲड. महेंद्रकुमार बुरड, 
जिल्हा प्रवासी (सेवा) संघ, 
अध्यक्ष, मलकापूर)

Web Title: The wait for the train journey for the commons is still on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.