मेहकर तालुक्यातील मजुरांच्या हाताला कामाची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:34 PM2017-12-08T13:34:58+5:302017-12-08T13:38:38+5:30
मेहकर : तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे होत असताना नियमांचे उल्लंघन होत आहे. मजूरांमार्फत कामे न करता मशिनच्या आधारे कामे करण्यात येत असल्याने तालुक्यातील मजुरांच्या हाताला कामाची प्रतीक्षा लागली आहे.
मेहकर : तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे होत असताना नियमांचे उल्लंघन होत आहे. मजूरांमार्फत कामे न करता मशिनच्या आधारे कामे करण्यात येत असल्याने तालुक्यातील मजुरांच्या हाताला कामाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, रोजगार हमीची कामे ही मजुरांमार्फत करावी जर मशीनद्वारे कामे केली तर कामाच्या ठिकाणी जाऊन ते काम बंद पाडण्यात येईल, तसेच यावर कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकाºयांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा राष्टवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे यांनी ५ डिसेंबर रोजी दिला आहे. ग्रामीण भागात विकासात्मक कामे व्हावीत, गोरगरीब मजुरांना आपल्या गावात अथवा परिसरात कामे मिळावीत, मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शासनाकडुन रोजगार हमीची योजना सुरू करण्यात आली आहे. गत काही वर्षाच्या काळात मेहकर तालुक्यातील रोजगार हमीची कोट्यावधीची कामे झाली आहेत. मात्र ही कामे होत असताना सर्रास मजूरांना डावलून मशीनच्या सहाय्याने कामे केली जातात. काही कामे वगळली तर बहुतांश ठिकाणी निकृष्ठ दर्जाची कामे झाली आहेत. त्यावेळी निकृष्ठ कामाच्या अनेकांनी तक्रारी सुध्दा केल्या होत्या. परंतु यावर कुठलीच कार्यवाही झाली नाही. वरीष्ठ अधिकारी तथा संबधित ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे रोहयोच्या कामांचा फज्जा उडत आहे. सध्या तालुक्यात ठिकठिकाणी रोजगार हमीच्या कामाला सुरूवात झालेली आहे. रोजगार हमीच्या कामावर आपली जे.से.बी. मशिन लावण्यासाठी संबंधित अनेकजण अधिकाºयाच्या भेटी-गाठी घेत आहेत. मात्र मशिनव्दारे रोजगार हमीची कामे केल्यास शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊन मजुरांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी रोजगार हमीची कामे सुरु होतील त्या-त्या ठिकाणी मजुरांनाच कामे द्यावीत, जर रोजगार हमीच्या कामावर मशिन आढळुन आली तर त्या कामावर जाऊन सदर काम बंद पाडुन मजुरांच्या हितासाठी वेळप्रसंगी जिल्हाधिकाºयांना घेराव घालण्याचा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसचे तालुका अध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे, संजय शेळके, गजानन सावंत, संजय गायकवा, रामदास लहाणे, अॅड.विजय मोरे, प्रभाकर सपकाळ, उध्दव भालेराव, अशोक लंबे आदींनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)