लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांमध्ये सध्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून जलजागृती करण्यात येत आहे.केंद्र शासनाच्या पाण्याच्या वाढत्या दुर्भिक्षावर उपाय शोधण्यासाठी व प्रभावी उपाय योजना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालय स्थापन केले आहे. या मंत्रालया अंतर्गत देशभरात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यांचा समावेश अभियानात करण्यात आला आहे. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांमध्ये जलजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागाने शाळां - शाळांमधून कार्यक्रम घेण्यात येत आहे. यामध्ये पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. वरवट बकाल ता. संग्रामपूर येथील नागेश्वर महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून पाणी वाचविण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. शालेय जीवनापासून पाणी बचतीचा संस्कार होणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळांमधून विद्यार्थ्यांच्या सहभागाने जल जागृती करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. एकलारा बानोदा येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी नाटीका सादर केली. या नाटीकेतून पाण्याअभावी सुंदर वसुंधरेचा होणारा विनाश यामध्ये दाखविण्यात आला. जलशक्ती अभियानातून विद्यार्थी जलजागृती करीत असल्यामुळे विद्यार्थीदशेतच त्यांच्यावर जलसंस्कार बिंबविल्या जात आहे.(प्रतिनिधी)जलशक्तीचा जागरङ्घबुलडाणा: शासनाने सुरू केलल्या जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून अनेकविध उपक्रमांमधून जलशक्तीचा जागर करण्यात येत आहे. त्यानुसार २२ जुलै रोजी संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील शिवशंकर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत २० विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. तसेच गावात जल जागृतीचा संदेश देणारी रॅली काढण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक आर. ओ. राठी, सहायक शिक्षण पी. एन. नागोलकर, सहायक शिक्षीका एम. जी. सोळंके, सहायक शिक्षीका पी. के. जवंजाळ, सहायक शिक्षक एम. एच. रौंदळे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पातुर्डा येथील जिल्हा परिषद शाळेत रांगोळी स्पर्धा २३ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. या रांगोळी स्पर्धेतून ३५ विद्यार्थीनींनी जलजागृतीचा संदेश दिला. जलशक्ती अभियानातून जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. जिल्हा परिषद विद्यालय, पातुर्डा येथे प्राचार्य एस. के देशपांडे, सहायक शिक्षीका व्ही. व्ही पाठक, शिक्षीका पी. एच. मानकर, आशा परेश पहुरकार, ममता संजय खांडे, मार्गदर्शक शिक्षक पी. एस सपकाळ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यातून जलजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 1:56 PM