समृध्दी महामार्गालगत पाणी निचरा होण्यासाठी सोय उपलब्ध नसल्याने संपूर्ण पाणी हे नाल्यातून शेतकऱ्यांच्या शेतात घुसून नुकसान होत आहे. जवळपास ९५ हेक्टर क्षेत्रावरी ८५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसाने डोणगांवसह शेलगाव देशमुख, कऱ्हाळवाडी परिसरातही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान ग्रस्त भागाची पाहणी तलाठी एस. एस. मस्के, कृषी सहाय्यक एच. डी. बोंद्रे, कोतवाल संदीप परमाळे, संतोष मानवतकर यांनी केली. यावेळी महामार्गालगत शेती असलेले सर्व शेतकरी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी
अंदाजे ८५ शेतकऱ्यांचे ९५ हेक्टरच्या आसपास नुकसान झाले आहे. हे नुकसान समृद्धी महामार्गाने पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन न केल्यामुळे झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
190821\new doc 2021-08-19 14.24.18_1.jpg
????? ?????????? ????? ????