लॉकडाउन असतानाही भरला जानेफळचा आठवडी बाजार; १९ व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 06:42 PM2020-04-04T18:42:16+5:302020-04-04T18:42:34+5:30
नियमाचा भंग केल्याप्रकरणी १९ व्यापाऱ्यांविरुद्ध कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
जानेफळ (बुलडाणा) संपूर्ण जगाला हादरवून सोडणाºया कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यत आला असून संचारबंदी लागू करण्यात आलेली असताना जानेफळ येथे शनिवारी आठवडी बाजार भरला. नियमाचा भंग केल्याप्रकरणी १९ व्यापाऱ्यांविरुद्ध कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
संसर्गजन्य आजार असलेल्या कोरोना बाधितांच्या आकडा राज्यात दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचे ५जण आढळलेले आहेत अशातच सर्वत्र घबराटीचे वातावरण बनलेले असल्याने संपूर्ण जिल्ह्याभरात गर्दी होणारे संपूर्ण ठिकाण बंद करण्याचा निर्णय घेण्यात येऊन तसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी जारी केलेले आहेता. या पृष्ठभूमीवर जानेफळ येथे दर आठवड्याला भरणा?्या आठवडी बाजाराप्रमाणे व्यापाºयांनी आपली दुकाने थाटल्याने मोठी गर्दी होऊन गोंधळ उडाला होता. जानेफळ सह परिसरातील काही खेड्यातील महिला व नागरिक सुद्धा बाजारासाठी आल्याने झालेली मोठी गर्दी पाहून त्याचे फोटो व व्हिडिओ जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तथा इतरांकडे एका सामाजिक कार्यकत्यार्ने पाठविल्याने त्याची दखल घेत उपरोक्त वरिष्ठांनी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्राम विकास अधिकारी यांना त्वरित कार्यवाहीचे करण्याचे आदेश बजावल्याने उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांच्या आदेशानुसार तलाठी विजेंद्र धोंडगे यांच्या तक्रारी वरुन १९ व्यापाºयांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
यांच्यावर झाली कारवाइ
शे.इमरान शे.रीयाज रा.सोनारगांव,शे.कादर शे.महमुलाल रा. जानेफळ,गजानन एकनाथ गुमटकर रा.जानेफळ,श्रीधर समाधान चांदणे रा.मुंदेफळ, गोपाल काळबांडे रा. मुंदेफळ, गणेश प्रभाकर रोकडे रा. जानेफळ, संजय कुंडलिक गोरे रा.जानेफळ, कैलास दौलत डवंगे रा.बोथा, अय्युब शाह महेबुब शाह रा. जानेफळ,संतोष करवंदे रा.जानेफळ,भानुदास हरीभाऊ मोसंबे रा.मो.वाडी,बाळु दगडूबा जाधव रा.जानेफळ, संतोष एकनाथ साळोक रा.जानेफळ,भारत आत्माराम खंडागळे रा.जानेफळ,शे.हूसेन तांबोळी रा.उटी, संतोष भास्कर दाभाडे रा.जानेफळ, शेख हसन शेख अब्दुल रा.उटी, गणेश पंजाब शेलार रा.जानेफळ, शेख फारुख शेख मजीद रा.जानेफळ या सर्वां विरुद्ध जमाव बंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून गर्दी जमा करणे तसेच शासनाच्या आदेशाचे पालन केले नसल्याबद्दल सदर कार्यवाही करण्यात आली आहे.