दोन वर्षांपासून वजनमापे तपासणी नाही
By admin | Published: October 29, 2016 02:46 AM2016-10-29T02:46:20+5:302016-10-29T02:46:20+5:30
वजन काट्यात ग्राहकांची फसगत होण्याची शक्यता
बुलडाणा, दि. २८- वजन मापे विभागाच्यावतीने दरवर्षी दुकानांमधील वजनमापे वैध मापन विभागाने तपासणी करायला हवी; मात्र गत दोन वर्षांंपासून जिल्ह्यात वजनमापांची तपासणीच करण्यात आली नाही. तब्बल नऊ हजार वजनमापे गत दोन वर्षात तपासली गेली नाही. त्यामुळे या वजनमापेद्वारा होणारे मोपमाप दोषपूर्ण ठरू शकते.
जिल्ह्यात सध्या विविध दुकानदार, मुख्य व्यावसायिक, लहान कारखाने, किराणा दुकानदार, स्वस्त धान्य दुकानदार, बियाणे व्यावसायिक, भाजी व फळ विक्रेते व इतर लहान-मोठय़ा व्यावसायिकांकडे इलेक्ट्रॉनिक व पारंपरिक वजनमापे आहेत, त्यापैकी वैधमापन विभागाकडून केवळ ४ हजार ३३५ वजनमापाची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात १३ हजार ४२५ वजनमापे असल्याची नोंद वजनमापे विभागाकडे आहे. त्याची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे; मात्र नऊ हजार वजनमापे दोषपूर्ण आहे.
बर्याच काट्यांचे पासिंगच नाही. त्यामुळे माल, वस्तू, सेवा खरेदी करताना दुकानदार, रस्त्यावरचे विक्रेते काटा मारतात. त्यामुळे बर्याच ग्राहकांची मोठी फसवणूक होते.
तपासणी प्रक्रिया अशी.
जुने तराजू व वजन मापे प्रमाणित आहेत किंवा नाही, याची तपासणी केली जाते. तसेच इलेक्ट्रॉनिक काटे मागे सील केलेली प्लेट वरील काट्यांची पासिंग तसेच तारीख आणि सीलवर केलेली छेडखानी याचीही तपासणी केली जाते. वजन व वजन काट्यामध्ये असलेले तफावत आढळल्यास तपासणी निरीक्षक पंचनामा करतो. अधिक तफावत जाणवल्यास जप्त करून त्यावर दंड आकारला जातो. सहायक नियंत्रक वैध मापन विभाग, बुलडाणा गत वर्षात वजनमापे तपासणी व दंड वसुलीसाठी जिल्हाभरात ६७१ जणांवर कारवाई केली.
वर्षभरातील कारवाई
तपासणी /कारवाई
स्वस्त धान्य १५
बियाणे ४५
तराजू ५२
पेट्रोलपंप ६१
व्यापारी २७२
जिनिंग/कारखाने १४३
इतर ८३