रेशन कार्डवरील मोफत धान्य गावांमध्ये कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:37 AM2021-04-28T04:37:41+5:302021-04-28T04:37:41+5:30
कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा? सध्याच्या परिस्थितीत हाताला काम नाही आणि रेशनवर मोफत धान्यही नाही. त्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, ...
कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा?
सध्याच्या परिस्थितीत हाताला काम नाही आणि रेशनवर मोफत धान्यही नाही. त्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे शासनाने मोफत धान्य वितरणाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी.
विलास खरात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात शासनाकडून मोफत धान्यवाटप केले जाणार असल्याने दिलासा मिळाला आहे. परंतु या धान्यासाठी लाभार्थ्यांना प्रतीक्षेत ठेवू नये.
उद्धव इंगळे
लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या घटकांना पुरवठा विभागाच्या मोफत धान्यवाटपामुळे चांगला फायदा होणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात आणि कामधंदे बंद झाल्याने मोफत धान्यवाटपाचा लाभ तातडीने देण्यात यावा.
विठ्ठल सरकटे
मोफत धान्य काय मिळणार?
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून दोन महिन्यांसाठी पाच किलो मोफत धान्य देण्यात येणार आहे. त्यामध्ये गहू, तांदूळ व डाळीचा समावेश आहे. मोफत धान्यामध्ये गहू, तांदळासोबतच नेमकी कोणती डाळ मिळणार याचा संभ्रम आहे. मोफत धान्यामध्ये तूरडाळ देण्याची मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.
बीपीएल - ३३७९५२
अंत्योदय- ६४८१०
केशरी- ३९७२२२