संग्रामपूर (बुलढाणा) : संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बु. येथील अनिता संतोष बावस्कर (३९) या महिलेने शुक्रवारी रात्री ७ वाजता दरम्यान घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी महिलेचा पती व मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी मृतकाचे वडिल शंकर नारायण गौरकार रा. वडनेर गंगाई ता. दर्यापूर जि. अमरावती यांच्या फिर्यादीवरून शनिवारी दुपारी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पती चारित्र्यावर संशय घेत असे. तर मुलगा पैसे मागत असल्याने त्या दोघांना कंटाळून मृतक महिलेने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
तक्रारीवरून पातुर्डा बु. येथील आरोपी संतोष शालिग्राम बावस्कर व कार्तिक संतोष बावस्कर या दोघांवर कलम ३०६,३४ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत.