लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमतीमध्ये केलेल्या वाढीचा निषेध करत जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने ९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.गॅसच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये ४२५ रुपयांना मिळणारे सिलींडर आज ८३४ रुपयांना मिळत आहे. पेट्रोलचे दरही १०० च्यावर गेले आहेत. डिझेलही ९७ रुपये झाले आहे. या इंधन दरवाढीमुळे महागाईचा उच्चांक गाठल्या जात आहे. त्यामुळे गृहीनीचेही कुटुंबाचे बजेट वाढले असून भाज्यांची फोडणीही कशीबशी दिल्या जात आहे. त्यानुषंगाने ही इंधन दरवाढ कमी करण्यात यावी, अशी मागणीही जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. यासंदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन पाठवले आहे. काँग्रेसच्या ॲड. जयश्री शेळके, जिल्हाध्यक्षा ॲड. ज्योती ढोकणे यांच्या नेतृत्त्वात या आंदोलनामध्ये महिला काँग्रेस्चया प्रदेश उपाध्यक्षा मीनल आंबेकर, ज्योत्सना जाधव, श्रद्धा गावंडे, सुनीता देशमुख, आशा इंगळे, सविता जंगले, नंदिनी टारपे, रिता चितारे, नवनिता चव्हाण, सुनंदा पवार, पंचफुला पाटील, लता माने, कमल गवई, सोनाली वाघ, स्मीता वराडे यांच्यासह अन्य सहभागी झाल्या होत्या.
इंधन दरवाढी विरोधात महिला काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 10:47 AM