या उपोषणाला मुबंई बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे, संतोषराव चनखोरे, मनसेचे लक्ष्मण जाधव, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष युनूस पटेल, तालुका अध्यक्ष भीमशक्ती प्रा. संजय वानखेडे, सुभाष गवई, अरुण गवई, संतोष अंभोरे, ज्ञानेश्वर गुंजकर, आकाश अवसरमोल, छोटू गवळी, विलास तुरुकमाने आदींनी भेटी देऊन पंचायत समितीचे पाटोळे व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
दरम्यान, रोजगार हमी योजनेचे जॉब कार्डचे वाटप लाभार्थ्यांना उपोषण मंडपात करण्यात आले. घरकुल योजनेचा लाभ योग्य व गरजू लाभार्थ्यांना तात्काळ देण्याचे लेखी आश्वासन पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे या उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी उपोषणकर्त्या महिलांची कोविड चाचणी करण्यात आली. उपोषणामध्ये बाभूखेड येथील विविध समाजाच्या महिला उपस्थित होत्या.