संपामुळे दुसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प; दैनंदिन कामे रखडली, नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 06:01 PM2018-08-08T18:01:53+5:302018-08-08T18:02:30+5:30
बुलडाणा : कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शासकीय कामकाज ठप्प पडले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह इतर संघटनांनी संपात सहभाग नोंदविल्याने दैनंदिन कामे खोळंबली.
बुलडाणा : कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शासकीय कामकाज ठप्प पडले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह इतर संघटनांनी संपात सहभाग नोंदविल्याने दैनंदिन कामे खोळंबली. शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्या मंजूर करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाºयांसह इतर कर्मचाऱ्यां तीन दिवसीय संप पुकारला आहे. सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, अंशदाई पेन्शन योजना रद्द करुन जुनीच पेन्शन योजना लागू करावी, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करण्यात यावे आदी प्रमुख मागण्यांसाठी हा संप सुरु आहे. संपाच्या दुसºया दिवशी म्हणजे ८ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. कर्मचाºयांनी दैनंदिन कामकाजात सहभाग घेतला नाही. त्यामुळे शासकीय कामकाज प्रभावित झाले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे ७ हजार कर्मचारी दुसºया दिवशीही संपावर असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तेजराव सावळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संपावर असल्याने कामे खोळंबली. जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेचे जवळपास ५० कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यामुळे पंचायत समिती स्तरावरील कामे रखडली. कृषी विभागाशी संबंधित कामानिमित्त येणाºया नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली. महसूल विभागातील कर्मचारी संपावर असल्याने नागरिकांना महत्वाचे दाखले मिळू शकले नाही. शिक्षकांच्या सहभागामुळे शाळाही बंद होत्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची भरपाई करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिली. ग्रामसेवक संघटनेचा संपाला पाठींबा असल्याने गावपातळीवरील कामांचा खोळंबा झाला. दरम्यान मंगळवारी पहिल्या दिवशी संपात सहभागी असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने दुसºया दिवशीपासून कामकाजात सहभाग घेतला.
परिचारिकांचे आज काळ्या फिती लावून कामकाज
रुग्णसेवेवर परिणाम होवू नये यासाठी महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेने कर्मचाºयांच्या तीन दिवसीय संपात सहभाग घेतलेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय व अधिनस्थ १६ आरोग्य संस्थामधील महाराष्ट्र आरोग्य सेवा संघटनेच्या परिचारिका कामावर आहेत. मात्र आपल्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करणाºया शासनाचा निषेध करण्यासाठी परिचारिका ९ आॅगस्ट रोजी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा आंधळे व सरचिटणीस शाईन मॅथ्यू यांनी ही माहिती दिली.