Lokmat Money > बिझनेस न्यूज > ६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?

६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?

Padam Cotton Yarns Share Price : कापड उत्पादनांच्या व्यवसायाशी संबंधित कंपनी आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 01:13 PM2024-11-20T13:13:36+5:302024-11-20T13:13:36+5:30

Padam Cotton Yarns Share Price : कापड उत्पादनांच्या व्यवसायाशी संबंधित कंपनी आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.

565% rise in Padam Cotton Yarns stock in 6 months Now ready to give bonus shares know stock details | ६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?

६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?

कापड उत्पादनांच्या व्यवसायाशी संबंधित पदम कॉटन यार्न ही कंपनी आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. या बैठकीत पदम कॉटन यार्न्सचं संचालक मंडळ बोनस शेअर देण्याबाबत विचार करणार आहे. बोनस शेअरच्या इश्यूपूर्वी मंगळवारी बीएसईवर पदम कॉटन यार्न्सचा शेअर २ टक्क्यांच्या अपर सर्किटसह २१३.३० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं मंगळवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३२.०२ रुपये आहे.

६ महिन्यांत ५६५ टक्क्यांची वाढ

पदम कॉटन यार्न्सच्या शेअरमध्ये गेल्या ६ महिन्यांत ५६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कापड उत्पादनांच्या व्यवसायात गुंतलेल्या पदम कॉटन यार्न्स या कंपनीचा शेअर २१ मे २०२४ रोजी ३२.०६ रुपयांवर होता. कंपनीचा शेअर १९ नोव्हेंबर २०२४ रोजी २१३.३० रुपयांवर बंद झाला. गेल्या तीन महिन्यांत पदम कॉटन यार्न्सच्या शेअरमध्ये २७० टक्क्यांची वाढ झाली आहे. १९ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर ५७.७३ रुपयांवर होता. कंपनीचा शेअर १९ नोव्हेंबर २०२४ रोजी २१३ रुपयांच्या वर बंद झाला.

३ वर्षांत २४००% पेक्षा अधिक वधारले

पदम कॉटन यार्न्सच्या शेअरमध्ये गेल्या ३ वर्षांत २४०३ टक्के वाढ झाली आहे. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी कंपनीचा शेअर ८.५२ रुपयांवर होता. पदम कॉटन यार्न्सचा शेअर १९ नोव्हेंबर २०२४ रोजी २१३.३० रुपयांवर बंद झाला. गेल्या दोन वर्षांत पदम कॉटन यार्न्सचा शेअर १५७३ टक्क्यांनी वधारला आहे. १७ नोव्हेंबर २०२२ रोजी कंपनीचा शेअर १२.७५ रुपयांवर होता. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर २१३ रुपयांच्या वर बंद झाला. गेल्या ४ वर्षात पदम कॉटन यार्न्सच्या शेअरमध्ये ३७५० टक्के वाढ झाली आहे. कंपनीचं मार्केट कॅप १०० कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे.

(टीप : यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: 565% rise in Padam Cotton Yarns stock in 6 months Now ready to give bonus shares know stock details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.