Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण

SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण

MTNL Stock Price: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) शेअरमध्ये ७ ऑक्टोबर रोजी ५ टक्क्यांची घसरण झाली आणि तो लोअर सर्किटवर पोहोचला. पाहा काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 02:28 PM2024-10-07T14:28:49+5:302024-10-07T14:31:04+5:30

MTNL Stock Price: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) शेअरमध्ये ७ ऑक्टोबर रोजी ५ टक्क्यांची घसरण झाली आणि तो लोअर सर्किटवर पोहोचला. पाहा काय आहे कारण?

A decision of SBI and MTNL share down lower circuit to share huge loan amount on govt telco | SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण

SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण

MTNL Stock Price: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) शेअरमध्ये ७ ऑक्टोबर रोजी ५ टक्क्यांची घसरण झाली आणि तो लोअर सर्किटवर पोहोचला. ३० जूनपासून हप्ते आणि व्याज न भरल्यानं स्टेट बँक ऑफ इंडियानं (एसबीआय) एमटीएनएलची कर्ज खाती एनपीए म्हणून जाहीर केली आहेत. एसबीआयनं नुकतीच शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलं होतं की, ३० सप्टेंबरपर्यंत एमटीएनएल कर्ज खात्यावर एकूण थकबाकी ३२५.५२ कोटी रुपये होती. बँका १२ महिन्यांपेक्षा कमी डिफॉल्ट पीरियड असलेल्या आणि थकबाकी भरण्याची क्षमता असलेल्या खात्यांचे एनपीए-निम्न मानक म्हणून वर्गीकरण करतात.

७ ऑक्टोबर रोजी बीएसईवर एमटीएनएलचा शेअर रेड झोनमध्ये म्हणजेच ५२.७२ रुपयांवर उघडला. त्यानंतर लगेचच तो मागील बंदच्या तुलनेत ५ टक्क्यांनी घसरला आणि ५२.१४ रुपयांवर लोअर सर्किटवर पोहोचला. कंपनीचं मार्केट कॅप ३,२०० कोटी रुपये आहे.

एमटीएनएलचं एकूण कर्ज ३१,९४४.५१ कोटी

थकबाकी न भरल्याबद्दल पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेसह अनेक बँकांनी एमटीएनएलवर कारवाई केली आहे. थकबाकी न भरल्यामुळे युनियन बँक ऑफ इंडियानं एमटीएनएलची सर्व खाती गोठवली आहेत. तोट्यात चाललेल्या एमटीएनएलनं बँका आणि वित्तीय संस्थांकडून एकूण ७,८७३.५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून कंपनीचे एकूण कर्ज ३१,९४४.५१ कोटी रुपये आहे.

एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत एमटीएनएलचं कामकाजातून मिळणारं एकत्रित उत्पन्न सुमारे ८ टक्क्यांनी घटून १८३.८५ कोटी रुपयांवर आलं आहे. वर्षभरापूर्वी ते १९९.४८ कोटी रुपये होता. निव्वळ एकत्रित तोटा जून २०२३ तिमाहीतील ८५१.९३ कोटी रुपयांवरून ९ टक्क्यांनी घटून ७७३.४६ कोटी रुपयांवर आला आहे.

एसबीआयनं काय म्हटलंय?

एसबीआयनं १ ऑक्टोबर २०२४ च्या पत्राद्वारे दिलेल्या माहितीनुसार व्याज आणि हप्ते न भरल्यामुळे एमटीएनएलचं टर्म लोन अकाऊंट खातं ३६७२६६५८९०३ हे २८ सप्टेंबर २०२४ पासून एनपीए - निम्न मानक श्रेणीत टाकण्यात आलं आहे. जर डिफॉल्ट कालावधी १२ महिन्यांपेक्षा कमी असेल आणि थकबाकीची परतफेड करण्याची क्षमता एनपीए म्हणून असेल तर बँका एनपीए-निम्न मानक असलेल्या खात्यांचं वर्गीकरण करतात. एसबीआयनं, एमटीएनएलकडे २८१.६२ कोटी रुपयांची थकबाकी आहे आणि खातं नियमित करण्यासाठी ते त्वरित फेडलं जावं, असं म्हटलं आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण आवश्यक आहे.)

Web Title: A decision of SBI and MTNL share down lower circuit to share huge loan amount on govt telco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.