Gautam Adani News : देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेच्या न्यायातून मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेच्या एका न्यायालयानं लाच आणि फसवणुकीचे आरोप केले आहे. ब्लूमबर्गनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. गौतम अदानीयांच्यासह सात जणांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आलेत. अमेरिकेतील या प्रकरणानंतर गौतम अदानी यांच्या कंपनीनं बाँडच्या माध्यमातून निधी उभारण्याची योजना रद्द केली आहे. बाँडच्या माध्यमातून कंपनीला ६० कोटी डॉलर्स उभारायचे होते, पण आता ही योजना रद्द करण्यात आली आहे.
अमेरिकन न्यायालयाच्या निर्णयानंतर कारवाई
गौतम अदानीसह ७ जणांवर अमेरिकेच्या न्यायालयात फसवणूक आणि लाचखोरीचे आरोप केल्याचं वृत्त ब्लूमबर्गनं दिलं होतं. अमेरिकेतील आरोपांनंतर गौतम अदानी यांच्या कंपनीनं मोठा निर्णय घेतला असून निधी उभारण्याची योजना रद्द करण्यात आली आहे.
अमेरिकन अॅटर्नी ऑफिसकडून अदानींवर आरोप
गौतम अदानी, सागर अदानी, विनीत एस जैन यांनी अमेरिकन, परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटं बोलून ही लाचेची रक्कम उभी केल्याचा आरोप आहे. २०२० ते २०२४ या कालावधीत अदानींसह सर्वांनी भारत सरकारसाठी कंत्राटं मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचं मान्य केलं होते. या प्रकल्पातून २० वर्षांत २ अब्ज डॉलरपेक्षा जास्त नफा होईल, असा अंदाज होता, असंही आरोपात म्हटलंय.
या चौघांनी ब्रायबरी स्कीममध्ये ग्रँड ज्युरी, एफबीआय आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनचा (एसईसी) तपास रोखण्याचा कट रचल्याचं न्यायालयात सांगण्यात आलं. सागर अदानी यांनी लाचेचे पैसे ट्रॅक करण्यासाठी आपल्या फोनचा वापर केला. अदानींच्या कंपन्यांनी सुमारे २०० कोटी डॉलरचे एकूण २ सिंडिकेट कर्ज उभं केलं असंही यावेळी सांगण्यात आलं.
यामध्ये कोणाची नावं?
यामध्ये गौतम अदानी, सागर एस अदानी, विनीत एस. जैन, रणजीत गुप्ता, सिरिल काबेनेस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा, रुपेश अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे.