Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरण आज थांबली आहे. सेन्सेक्स-निफ्टीतील बंपर तेजीमुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्येही उसळी पाहायला मिळत आहे. कामकाजाच्या सुरुवातीला अदानी एंटरप्रायझेस२.८३ टक्क्यांनी वधारून २२९१ रुपयांवर आला. अदानी पॉवरचा शेअर २.८२ टक्क्यांनी वधारून ४७३.४५ रुपयांवर व्यवहार करत होता. अदानी पोर्ट्सही २.६८ टक्क्यांनी वधारून १,१६७.२० रुपयांवर पोहोचला. अदानी ग्रीन एनर्जीमध्ये ४.४९ टक्क्यांची चांगली वाढ झाली आहे. अदानी विल्मरचा शेअरही १.७४ टक्क्यांनी वधारून २९७.४५ रुपयांवर पोहोचला आहे.
भारतीय ऊर्जा कंपनीच्या उपकंपन्या आणि अमेरिकन कंपन्यांना व्यवसाय मिळविण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी अमेरिकन कंपन्यांवर कोणतीही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत, असं अमेरिकन न्याय विभागानं २० नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत म्हटलंय.
अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासह अन्य सात अधिकाऱ्यांवर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अॅज्योर पॉवर यांना देण्यात आलेल्या सौर ऊर्जेच्या कंत्राटांवर अनुकूल अटींच्या बदल्यात २०२० ते २०२४ या कालावधीत अज्ञात भारतीय अधिकाऱ्यांना २,००० कोटी रुपयांची (२५० मिलियन डॉलर्स) लाच दिल्याचा आरोप आहे. दरम्यान, अदानी समूहाकडून हे आरोप फेटाळण्यात आलेत आणि ते निराधार असल्याचं त्यांनी म्हटलंय. या आरोपांनंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती.
(टीप : यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)