Airport Lounge: नवी दिल्ली : भारतात हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये नवीन विमानतळ बांधले जात आहेत आणि अनेक विमानतळांवर प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधांचा विस्तार केला जात आहे. अनेकदा विमान प्रवास करण्यासाठी काही तास आधीच विमानतळावर पोहोचावे लागते.
अनेक वेळा कनेक्टिंग फ्लाइटमुळे अनेक तास विमानतळावर थांबावे लागते. अशावेळी आराम करण्यासाठी आणि खाण्या- पिण्यासाठी आठवण येते की म्हणजे, एअरपोर्ट लाउंजची. परंतु याठिकाणी क्रेडिट कार्डशिवाय अॅक्सेस मिळत नाही. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर आम्ही तुम्हाला अशा डेबिट कार्डांबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्हाला एअरपोर्ट लाउंजमध्ये ॲक्सेस मिळू शकतो.
AU Royale डेबिट कार्ड
AU Royale स्मॉल फायनान्स बँक आहे, ती तुम्हाला देशांतर्गत विमानतळांवर वर्षातून आठ वेळा लाउंजमध्ये ॲक्सेस देते. यासाठी तुम्हाला गेल्या तीन महिन्यांत डेबिट कार्डद्वारे केवळ 5000 रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान, AU Royale स्मॉल फायनान्स बँकेच्या साईटवर या कार्डच्या फीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Axis Bank Burgundy डेबिट कार्ड
ॲक्सिस बँकेचे हे डेबिट कार्ड भारतातील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर एका तिमाहीत तीन विनामूल्य लाउंज ॲक्सेस देते. हे डेबिट कार्ड फक्त Burgundy खातेधारकांना दिले जाते आणि या कार्डवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ॲक्सिस बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या सुविधेसाठी तुम्हाला तीन कॅलेंडर महिन्यांत फक्त 5000 रुपये खर्च करावे लागतील.
HDFC Bank Platinum डेबिट कार्ड
एचडीएफसी बँक या डेबिट कार्डवर प्रत्येक तिमाहीत भारतभर विमानतळ लाउंजमध्ये दोनदा ॲक्सेस मिळतो. यासाठी, एचडीएफसी बँक प्लॅटिनम डेबिट कार्ड युजर्सला प्रिव्हियस कॅलेंडर तिमाहीत या डेबिट कार्डद्वारे 5000 रुपये खर्च करावे लागतील. एचडीएफसी बँक प्लॅटिनम डेबिट कार्ड कोणत्याही भारतीय आणि अनिवासी भारतीय ग्राहकाला मिळू शकते. एचडीएफसी बँक प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी, 850 रुपये वार्षिक शुल्क भरावे लागेल.