नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन लवकरच ड्रोनने सामानाची डिलिव्हरी करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे फक्त 30 मिनिटांत ड्रोनच्या मदतीने सामान घरी येणार आहे. अॅमेझॉनला पार्ट 135 एअर कॅरिअर सर्टिफिकेट मिळालं आहे. त्यामुळे कंपनी प्राइम एअर ड्रोन्स वापरू शकते. अमेरिकेच्या एफएएने अॅमेझॉनला ड्रोनमार्फत पॅकेज डिलिव्हरीसाठी परवानगी दिल्याचं सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन सध्या ड्रोनचं उड्डाण आणि इतर गोष्टींचं परीक्षण करत आहे. सामानाची ड्रोनमार्फत डिलिव्हरी नेमकी कधी सुरू केली जाणार याबाबत ग्राहकांना सध्या सांगू शकत नसल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. ड्रोनच्या मदतीने सामानाची डिलिव्हरी करण्याच प्रयत्न सुरू आहे. मात्र हे करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ बेजोसने 2013 मध्ये एका टीव्ही कार्यक्रमात अॅमेझॉन येत्या काही वर्षांत ड्रोनने डिलिव्हरी करणार असल्याचं म्हटलं होतं.
अॅमेझॉनला ऑपरेशन सेफ्टीचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे आणि एफएएसमोर प्रदर्शनही करावं लागणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. अॅमेझॉन जगातील कित्येक देशांमध्ये एका दिवसात डिलिव्हरी करतं. मात्र आता हा डिलिव्हरी टाईम आणखी कमी करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. पार्ट 135 एअर कॅरियर सर्टिफिकेट मिळणारी ॲमेझॉन तिसरी कंपनी आहे. याआधी गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटच्या विंग एव्हिएशन आणि यूपीएस फ्लाइट फॉरवर्डला हे सर्टिफिकेट मिळालं आहे.
कोणत्याही कंपनीने मात्र अद्याप मोठ्या प्रमाणात ड्रोनने डिलिव्हरी करणं सुरू केलं नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असलेल्या अॅमेझॉन इंडिया आपल्या ग्राहक सेवा (कस्टमर सर्व्हिस) शाखेत 20 हजार हंगामी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे अशी कंपनीच्या वतीने अधिकृतरीत्या ही घोषणा करण्यात आली होती. ही भरती हैदराबाद, पुणे, कोईमतूर, नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदीगड, मंगळुरू, इंदूर, भोपाळ आणि लखनौ या शहरांसाठी होणार आहे.
WhatsApp वरचे 'हे' भन्नाट फीचर्स माहितीहेत का?https://t.co/cNdQHugspI#WhatsApp#Technology
— Lokmat (@MiLOKMAT) September 3, 2020
महत्त्वाच्या बातम्या
जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग
"नोटबंदीचा श्रीमंत उद्योगपतींना झाला फायदा, गरीब-मजुरांवर सर्वात मोठा हल्ला"
बापरे! तरुणीच्या पोटात होता तब्बल 7 किलो केसांचा गोळा, डॉक्टरही झाले हैराण
CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 83,883 नवे रुग्ण, 38 लाखांचा टप्पा केला पार
"सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप भाजपाला महागात पडेल"