Lokmat Money > बिझनेस न्यूज > Apple देशातील 'या' शहरांमध्ये सुरू करणार नवे स्टोअर्स, महाराष्ट्रातील दोन शहरांची निवड

Apple देशातील 'या' शहरांमध्ये सुरू करणार नवे स्टोअर्स, महाराष्ट्रातील दोन शहरांची निवड

Apple new Stores in Maharashtra: राजधानी दिल्ली आणि मुंबईनंतर ॲपल कंपनी देशात आणखी चार नवीन स्टोअर्स सुरू करणार आहे. यातील दोन स्टोअर्स हे महाराष्ट्रात असणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 01:27 PM2024-10-04T13:27:16+5:302024-10-04T13:32:17+5:30

Apple new Stores in Maharashtra: राजधानी दिल्ली आणि मुंबईनंतर ॲपल कंपनी देशात आणखी चार नवीन स्टोअर्स सुरू करणार आहे. यातील दोन स्टोअर्स हे महाराष्ट्रात असणार आहे. 

Apple will open four new stores in different cities of the country including Pune, Mumbai | Apple देशातील 'या' शहरांमध्ये सुरू करणार नवे स्टोअर्स, महाराष्ट्रातील दोन शहरांची निवड

Apple देशातील 'या' शहरांमध्ये सुरू करणार नवे स्टोअर्स, महाराष्ट्रातील दोन शहरांची निवड

Apple Stores in Maharashtra: iPhone उत्पादक कंपनी ॲपल लवकरच भारतात आणखी चार रिटेल स्टोअर्स सुरू करणार आहे, असे वृत्त माध्यमांनी रिपोर्ट्सच्या हवाल्याने दिले आहे. कंपनीने यापूर्वी दोन स्टोअर्स सुरू केलेली आहेत, ज्यातील एक राजधानी दिल्लीत, तर दुसरे आर्थिक राजधानी मुंबईत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲपल कंपनीने iPhone 16 pro आणि iPhone 16 pro max मेड इन इंडिया अर्थात भारतात तयार करण्यात आलेल्या मोबाईल्सची विक्री करत आहे. 

गेल्यावर्षी ॲपलने भारतात पहिल्यांदाच रिटेल स्टोअर्स सुरू केले. मुंबई आणि दिल्ली अशा दोन शहरात हे स्टोअर्स असून मुंबईतील स्टोअर्स वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. या स्टोअर्समध्ये ग्राहकांना सर्व प्रोडक्ट्स बघता आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

पुण्यात ॲपल सुरू करणार रिटेल स्टोअर

रिपोर्ट्सनुसार, ॲपलचे  रिटेल विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डिअर्डे ओब्रायन यांनी सांगितले की, आम्ही भारतात आणखी रिटेल स्टोअर्स सुरू करण्याचे नियोजन करत आहोत. हे स्टोअर्स पुणे, बंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबईत सुरू केले जातील. 

ॲपलच्या iPhone 16 च्या जुळवणीचे काम भारतात सुरू झालेलं आहे. यात iPhone 16 pro आणि iPhone 16 pro max यांचाही समावेश आहे. याआधी ॲपल भारतात जुन्या मॉडेल्स तयार करत होती. आता कंपनीने नवीन मॉडेल्सचेही उत्पादन सुरू केले आहेत. 

Web Title: Apple will open four new stores in different cities of the country including Pune, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.