Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Holiday : पुढच्या 10 दिवसांत 6 दिवस 'या' शहरांत बँका राहणार बंद; झटपट चेक करा RBI च्या सुट्ट्यांची यादी

Bank Holiday : पुढच्या 10 दिवसांत 6 दिवस 'या' शहरांत बँका राहणार बंद; झटपट चेक करा RBI च्या सुट्ट्यांची यादी

bank holiday banks to be shut for 6 days in last 10 days of august 2021 : बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण या महिन्यात पुढच्या 10 दिवसांपैकी बँका 6 दिवस बंद राहणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 11:44 AM2021-08-21T11:44:18+5:302021-08-21T11:51:21+5:30

bank holiday banks to be shut for 6 days in last 10 days of august 2021 : बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण या महिन्यात पुढच्या 10 दिवसांपैकी बँका 6 दिवस बंद राहणार आहेत.

bank holiday banks to be shut for 6 days in last 10 days of august 2021 check bank band full list | Bank Holiday : पुढच्या 10 दिवसांत 6 दिवस 'या' शहरांत बँका राहणार बंद; झटपट चेक करा RBI च्या सुट्ट्यांची यादी

Bank Holiday : पुढच्या 10 दिवसांत 6 दिवस 'या' शहरांत बँका राहणार बंद; झटपट चेक करा RBI च्या सुट्ट्यांची यादी

नवी दिल्ली - बँक बंद असली की अनेकदा पैशांची चणचण भासू लागते. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागतं. बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण या महिन्यात पुढच्या 10 दिवसांपैकी बँका 6 दिवस बंद राहणार आहेत. या काळात ऑनलाईन बँकिंग सेवा आणि एटीएम सेवा कार्यरत राहणार आहे. आरबीआय स्थानिक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या झोनसाठी बँक सुट्ट्यांची यादी जारी करते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या यादीनुसार, ऑगस्ट 2021 साठी 15 सुट्ट्या देण्यात आल्या. यात दोन रविवार आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे.

येत्या काळात बँका कधी आणि कुठे बंद राहतील याची माहिती जाणून घेऊया. जेणेकरून वेगवेगळ्या शहरांमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (RBI Bank Holiday List) पाहून तुम्ही तुमच्या शहरात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील याची माहिती घेऊ शकता. त्यानुसार तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन करू शकता. 28 ऑगस्ट हा महिन्याचा चौथा शनिवार आहे, ज्यामुळे बँका बंद राहतील. याशिवाय 29 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे. 

जाणून घ्या, बँका कधी आणि कुठे राहणार बंद? 

1) 22 ऑगस्ट 2021 – रविवार

2) 23 ऑगस्ट 2021 – श्री नारायण गुरू जयंती (तिरुअनंतपुरम आणि कोची)

3) 28 ऑगस्ट 2021 – चौथा शनिवार

4) 29 ऑगस्ट 2021 – रविवार

5) 30 ऑगस्ट 2021 – जन्माष्टमी / कृष्ण जयंती (अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, देहरादून, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोक)

6) 31 ऑगस्ट 2021 – श्रीकृष्ण अष्टमी (हैदराबाद).
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

SBI नेटबँकिंग, मोबाईल बँकिंगचा वापर करता? मग करा 'हे' मोठं काम अन्यथा खात्यातून गायब होतील पैसे

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने ग्राहकांना एक महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. जर तुम्ही देखील नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना दिलेल्या माहितीनुसार, देशभरात झपाट्याने वाढणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीमुळे ग्राहकांचं मोठं नुकसान होत आहे अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा नेट बँकिंग पासवर्ड बदलून अशी फसवणूक टाळू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये स्ट्रॉन्ग आणि अनब्रेकेबल पासवर्ड तयार करण्याचे 8 मार्ग सांगितले आहेत. 

Web Title: bank holiday banks to be shut for 6 days in last 10 days of august 2021 check bank band full list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.