भारतात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. शिवाय दर रविवारी बँकेला सुट्टी असते. जर आठवड्यात ५ शनिवार असतील तर बँका पाचव्या शनिवारी सुरू राहतील. १२ महिन्यांत देशातील विविध राज्यांमध्ये बँकांना अनेक सुट्ट्या असतात.
काही सुट्ट्या केवळ राज्यानुसार असतात तर काही राष्ट्रीय स्तरावरील असतात. अधिकृतपणे २६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि २ ऑक्टोबर या राष्ट्रीय सुट्ट्या मानल्या जातात.