Lokmat Money >बँकिंग > २५ वर्षांचे गृहकर्ज फक्त १० वर्षात फिटेल; या ३ स्मार्ट टीप्स वापरा आणि टेन्शनमुक्त व्हा

२५ वर्षांचे गृहकर्ज फक्त १० वर्षात फिटेल; या ३ स्मार्ट टीप्स वापरा आणि टेन्शनमुक्त व्हा

Home Loan Tips : फक्त ३ टीप्स वापरुन तुम्ही तुमच्या गृहकर्जाचा कालावधी २५ वर्षांहून १० वर्ष करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:45 IST2025-03-31T11:22:25+5:302025-03-31T11:45:55+5:30

Home Loan Tips : फक्त ३ टीप्स वापरुन तुम्ही तुमच्या गृहकर्जाचा कालावधी २५ वर्षांहून १० वर्ष करू शकता.

25 years home loan may be close in just 10 year by this strategy and tips | २५ वर्षांचे गृहकर्ज फक्त १० वर्षात फिटेल; या ३ स्मार्ट टीप्स वापरा आणि टेन्शनमुक्त व्हा

२५ वर्षांचे गृहकर्ज फक्त १० वर्षात फिटेल; या ३ स्मार्ट टीप्स वापरा आणि टेन्शनमुक्त व्हा

Home Loan Tips : शहरात आलेल्या प्रत्येकाचं आपल्या हक्काच घर असावं असं स्वप्न असते. त्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असतात. बहुतेक लोकांना घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याची गरज पडते. मात्र, हे कर्ज फेडण्यात लोकांचं आयुष्य खर्ची पडतं. अशा परिस्थितीत लवकर गृहकर्ज फेडण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. तुम्हीही अशाच स्थितीत सापडला असाल तर आम्ही काही टीप्स घेऊन आलो आहोत. याद्वारे तुम्ही तुमच्या कर्जाचे ओझं लवकर हलकं करू शकता.

कर्जाच्या हप्त्याचं गणित कसं असतं?
समजा तुम्ही २५ वर्षांसाठी ५० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे. हे कर्ज तुम्हाला बँकेने ८.५ टक्के व्याजदराने दिले आहे. त्यानुसार तुमच्या मासिक गृहकर्जाचा ईएमआय ४०,००० रुपये होतो. सुरुवातीच्या वर्षांत बँक तुमच्या कर्जावर अधिक व्याज आकारते. उदा. तुम्ही ४०,००० रुपयांच्या EMI द्वारे ४.८० लाख रुपये भरता. तेव्हा तुमच्या कर्जाची मूळ रक्कम केवळ ६०,००० रुपयांनी कमी होते आणि ४.२० लाख रुपये फक्त व्याजापोटी जातात.

अतिरिक्त पेमेंट करा
जर तुम्हाला २५ वर्षांचे गृहकर्ज फक्त १० वर्षात पूर्ण करायचे असेल, तर तुम्हाला मासिक हप्त्याव्यतिरिक्त जास्त पेमेंट करावे लागेल. म्हणजे तुमचा ईएमआय ४०,००० रुपये असेल तर तुम्ही अतिरिक्त पेमेंट करू शकता. या पैशातून तुमच्या व्याजाची रक्कम नाही तर मूळ रक्कम कमी होईल. यामुळे कर्जाचा कालावधी २५ वर्षांवरून २० वर्षांपर्यंत कमी होईल.

दरवर्षी ईएमआय ७.५ टक्के दराने वाढवा
तुम्हाला तुमचा EMI दरवर्षी ७.५ टक्के दराने वाढवावा लागेल. असे केल्याने तुमच्या कर्जाचा कालावधी २५ वर्षांवरून १२ वर्षांपर्यंत कमी होईल. तुमच्या कर्जाच्या कमी कालावधीमुळे, तुम्हाला कमी कालावधीसाठी कमी रक्कम भरावी लागेल आणि तुम्ही लवकर कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडू शकता.

वाचा - आयटीआर ते पॅनकार्ड.. 'ही' आर्थिक कामे पूर्ण करण्याचा आज शेवटचा दिवस; उद्या बसेल भुर्दंड

वर दिलेल्या दोन टीप्स एकत्र करुन तुम्ही कर्ज फेडण्याचे धोरण राबवू शकता. याचा अवलंब करून तुम्ही तुमचे २५ वर्षांचे कर्ज १० वर्षात बंद करू शकता. जर तुम्ही दरवर्षी ४०,००० रुपयांचा अतिरिक्त हप्ता जमा केला आणि दर वर्षी ७.५% दराने EMI वाढवला, तर तुमच्या कर्जाची मुदत फक्त १० वर्षे असेल.

Web Title: 25 years home loan may be close in just 10 year by this strategy and tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.