Lokmat Money >बँकिंग > बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?

बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?

5 Day Work Week For Banks : अनेक दिवसांपासून बँक कर्मचारी आठवड्यातून दोन दिवस सुट्टीची मागणी करत आहेत. त्यांना शनिवार आणि रविवारी सुट्टी देण्यात यावी, अशी बँक कर्मचाऱ्यांची मागणी आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:33 PM2024-10-21T12:33:09+5:302024-10-21T12:34:02+5:30

5 Day Work Week For Banks : अनेक दिवसांपासून बँक कर्मचारी आठवड्यातून दोन दिवस सुट्टीची मागणी करत आहेत. त्यांना शनिवार आणि रविवारी सुट्टी देण्यात यावी, अशी बँक कर्मचाऱ्यांची मागणी आहे. 

5 Day Work Week For Banks Bank opening hours will change 2 days off in a week what is the new rule govt rbi permission pending | बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?

बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?

5 Day Work Week For Banks : जर तुम्ही बँक कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. अनेक दिवसांपासून बँक कर्मचारी आठवड्यातून दोन दिवस सुट्टी ची मागणी करत आहेत. त्यांना शनिवार आणि रविवारी सुट्टी देण्यात यावी, अशी बँक कर्मचाऱ्यांची मागणी आहे. अशा परिस्थितीत बँक कर्मचाऱ्यांची ही मागणी सरकार मान्य करू शकते. या मागणीवर इंडियन बँक्स कॉन्फेडरेशन (IBA) आणि बँक कर्मचारी संघटनांमध्ये एकमत झालंय.

इंडियन बँक्स कॉन्फेडरेशन (IBA) आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात बँकेत पाच दिवस काम करण्याबाबत एकमत झालं आहं. अशा तऱ्हेनं सरकारनंही या निर्णयाला मान्यता दिल्यास या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा नियम लागू होऊ शकतो. इंडियन बँक्स कॉन्फेडरेशन आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात झालेल्या करारानुसार सर्व खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका दोन दिवसांच्या सुट्टीच्या नियमाखाली येतील.

नवी वेळ काय असेल?

इंडियन बँक्स कॉन्फेडरेशन आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यातील कराराला एक वर्ष पूर्ण होत आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँकेची (RBI) मान्यता घेणे आवश्यक आहे. सरकारनं या नियमाच्या अंमलबजावणीला मंजुरी दिल्यास बँक बंद होण्याच्या आणि उघडण्याच्या वेळेतही बदल होईल. सध्या सर्व बँका सकाळी १० वाजता उघडतात आणि संध्याकाळी ५ वाजता बंद होतात. नवीन नियम लागू झाल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांना सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत काम करावं लागणार आहे.

दीर्घकाळापासून मागणी

बँक संघटना २०१५ पासूनच दर शनिवार आणि रविवारी सुट्टी देण्याची मागणी करत होत्या. २०१५ मध्ये झालेल्या दहाव्या द्विपक्षीय करारानुसार आरबीआय आणि सरकारनं आयबीएसह दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी म्हणून निश्चित केला होता. आता हा प्रस्ताव मंजूर झाल्यास बँक कर्मचारी आठवड्यातून फक्त ५ दिवस काम करतील.

Web Title: 5 Day Work Week For Banks Bank opening hours will change 2 days off in a week what is the new rule govt rbi permission pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.