Lokmat Money >बँकिंग > ६४% लाेकांकडे नाही गुलाबी नाेट; आहेत ते खपविण्यासाठी काय करतायत?

६४% लाेकांकडे नाही गुलाबी नाेट; आहेत ते खपविण्यासाठी काय करतायत?

ज्यांच्याकडे या नाेटा आहेत, त्यांना त्या खर्च करण्यात अडचण येत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 05:41 AM2023-05-27T05:41:03+5:302023-05-27T05:41:28+5:30

ज्यांच्याकडे या नाेटा आहेत, त्यांना त्या खर्च करण्यात अडचण येत आहे. 

64% do not have a pink tie; What do they do to make ends meet? | ६४% लाेकांकडे नाही गुलाबी नाेट; आहेत ते खपविण्यासाठी काय करतायत?

६४% लाेकांकडे नाही गुलाबी नाेट; आहेत ते खपविण्यासाठी काय करतायत?

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आरबीआयने २ हजार रुपयांची नाेट चलनातून मागे घेण्याच्या निर्णयानंतर लाेकांमध्ये भीतीचे वातावरण नाही.  नाेटा बदलून घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी फार अडचणीविना हे काम सुरू आहे. किती लाेकांकडे ही नाेट आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये सातत्याने उपस्थित हाेत आहे. 
एका सर्वेक्षणानुसार, देशात ६४ टक्के लाेकांकडे २ हजार रुपयांची एकही नाेट नाही. ज्यांच्याकडे या नाेटा आहेत, त्यांना त्या खर्च करण्यात अडचण येत आहे. 

नाेटा खपविण्यासाठी काय करतात?
सराफा बाजार : साेने खरेदी वाढली आहे. दुप्पट व्यवहार वाढला आहे.
 इलेक्ट्राॅनिक बाजारपेठ : ऑफ सिझनमध्ये अचानक गर्दी वाढली आहे. लाेक टीव्ही, फ्रीज, वाॅशिंग मशीन इत्यादी गृहोपयाेगी उपकरणे खरेदी करत आहेत.
पेट्राेल-डिझेल खरेदी : लाेकांचा भर दिसून येत आहे. मात्र, पेट्राेल पंपांवर सुट्या पैशांच्या अडचणीमुळे किमान १ हजार रुपयांचे इंधन  भरण्याची अट 
ठेवली आहे. तर काही ठिकाणी नाेट स्वीकारली जात नाही.
कॅश ऑन डिलिव्हरी : ऑनलाइन शाॅपिंग वाढली. आहे. लाेक आधी खरेदीसाठी, युपीआय डेबिट वा क्रेडिट कार्डचा वापर करीत हाेते. आता कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडतात. चलन वैध असल्याने नाकारता येत नाही.

रोखीचा मोह कायम

देशात डिजिटल पेमेंटमध्ये माेठी वाढ झाली तरीही राेखीने देवाणघेवाणीचा माेह कमी झालेला नाही. वर्षभरात एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. कॅश मॅनेजमेंट कंपनी ‘सीएमएस’ने एक अहवाल सादर केला आहे. काेराेनानंतर अर्थव्यवस्थेत राेखीचे महत्त्व वाढले. रिटेल कॅश मॅनेजमेंटवरील खर्चही वाढला आहे.

५ राज्यांमधून १५ लाख काेटी रुपये काढले 
n महाराष्ट्रासह युपी, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांतील एटीएममधून १५ लाख काेटी रुपये काढण्यात आले. 
n ही रक्कम काढण्यासाठी ६९.५ काेटी वेळा डेबिट कार्डचा वापर झाला. 
 

Web Title: 64% do not have a pink tie; What do they do to make ends meet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.