मुंबई :
नोटाबंदी होऊन ६ वर्षे झालेली असताना तसेच डिजिटल पेमेंटमध्येही विक्रमी वाढ झालेली असताना या काळात सामान्य नागरिकांकडील रोख रक्कम १३.१८ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर करुन १ हजार आणि ५०० रुपयांच्या नाेटा चलनातून बाद ठरविल्या हाेत्या. कोरोना काळात पैशांच्या देवघेवीसाठी डिजिटल पर्यायाचा वापर वाढला. डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाल्यानंतर रोख रकमेचे अर्थव्यवस्थेतील प्रमाण कमी व्हायला हवे होते. तथापि, तसे झालेले दिसून येत नाही.
भारतीय रिझर्व बँकेच्या (आरबीआय) आकडेवारीनुसार, ४ नोव्हेंबर २०१६ रोजी संपलेल्या पंधरवड्यात अर्थव्यवस्थेत १७.७ लाख कोटी रुपयांची रोख रक्कम होती. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी ती वाढून ३०.८८ लाख कोटी रुपये झाली. ६ वर्षांत ७१.८४% वाढ