लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खासगी बँकांप्रमाणेच आता देशातील सरकारी बँकांमध्येही तंत्रज्ञानाचा लक्षणीय अंतर्भाव झाला असून, या बँकांनी गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल ८३ हजार ९१ कोटी रुपयांचे कर्ज डिजिटल माध्यमातून वितरित केले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कर्ज वितरणाचा हा सरकारी बँकांचा आजवरचा विक्रम आहे.
उपलब्ध माहितीनुसार, २०१८ मध्ये अद्ययावत तंत्रज्ञान प्रणालीचा सरकारी बँकांच्या कामकाजात अवलंब करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आंतरबँकिंग व्यवहार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरू झाले, तर आता दुसऱ्या टप्प्यांत प्रत्यक्ष ग्राहक सेवा व्यवहारांना सुरुवात झाली आहे. आता ग्राहकांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध असल्याने बँकांना ग्राहकांना कर्ज देणे, मुदत ठेवी स्वीकारणे, विमा योजना देणे, पीपीएफ सारखी सुविधा ऑनलाइन देणे सुकर झाली आहे. मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत बँकेने सामान्य ग्राहक, शेतकरी, छोटे उद्योजक अशा एक लाखापेक्षा जास्त ग्राहकांना तब्बल ८३ हजार ९१ कोटी रुपयांचे कर्ज डिजिटल पद्धतीने दिल्याची माहिती आहे.
सरकारी बँकांवरच विश्वास अधिकnदेशात खासगी बँकांचे जाळे कितीही विस्तारले असले आणि त्यांची सेवा कितीही सुलभ असली तरी आजही अनेकांना कर्ज घेताना आणि मुदत ठेवी ठेवताना सरकारी बँकांवरच जास्त विश्वास वाटतो. nमात्र, ज्या प्रमाणात तंत्रज्ञानाच्या अंतर्भावातून खासगी बँकिंग सेवांमध्ये सुलभता आली त्या तुलनेने सरकारी बँकांत मात्र तांत्रिक सुलभता मर्यादित स्वरूपात आली होती. nमात्र, आता सरकारी बँकांनीही गेल्या तीन वर्षांत विविध बँकिंग तंत्रज्ञान प्रणालीचा अवलंब कामकाजात केला असून, यामुळेच सरकारी बँकांतील कामाचा वेगही वाढला आहे आणि कामे होण्याचा वेळ कमी झाला आहे.
७९% ग्राहक...ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग या सुविधाही आता सरकारी बँकांकडून देण्यात येत असून, सध्या सरकारी बँकांचे ७९ टक्के ग्राहक या सेवांच्या माध्यमातून बँकिंग सेवेचा लाभ घेतात. त्यामुळे ग्राहकांना सुविधा तर प्राप्त होत आहेतच, पण ग्राहकांचा प्रत्यक्ष बँकेतील वावर कमी झाल्यामुळे बँकांचा ग्राहक सेवेवरील खर्चही कमी झाला आहे.
कसे मिळते कर्ज ?बँकेच्या वेबसाइट अथवा मोबाइल ॲपवरून ग्राहकाला कर्जासाठी अर्ज करता येतो.याकरिता कोणतीही वेगळी कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही.बँक आपल्या ग्राहकाची सर्व माहिती, त्याचे आर्थिक व्यवहार, सिबिल स्कोअर आदी माहिती जमा करते.ग्राहकाची कर्जाची मागणी आणि त्याची जेवढी पत आहे, त्यानुसार मग कर्जाचे वितरण ४८ तासांच्या आत केले जाते.
तंत्रज्ञानामुळे काय बदलले?nबँकांच्या सर्व शाखांची मध्यवर्ती सर्व्हर माध्यमातून जोडणी झालेली आहे.nदोन भिन्न बँकाही एकमेकांना संगणकामार्फत जोडलेल्या आहेत.nग्राहकांची सर्व वैयक्तिक माहिती बँकांच्या सर्व्हरमध्ये साठविलेली आहे. nआधार कार्ड, पॅन कार्ड, आयकर विभागातील माहितीही बँकांना ऑनलाइन मिळते.