Join us  

SBI कडून लोन घेणाऱ्यांना मोठा झटका, आजपासून लागू झाला नवा नियम; 31 डिसेंबरपर्यंत होम लोनवर सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 3:11 PM

एसबीआयने बेस रेट 10.10% ने वाढवून 10.25% केला आहे.

जर आपण एसबीआय कडून लोन घेतले असेल अथवा लोन घेण्याचे नियोजित असेल तर, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. हो, देशातील सर्वात मोठ्या पब्‍ल‍िक सेक्‍टर बँकेने अर्थात एसबीआयने एमसीएलआर (MCLR) आणि बेस रेटमध्ये वाढ केली आहे. हे नवे दर बँकेकडून 15 डिसेंबर, 2023 पासून लागू केले जाणार आहेत. एसबीआयच्या वेबसाइटवरही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. एमसीएलआर हा एक असा किमान व्याज दर, ज्यानुसार बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देऊ शकते. एसबीआयने बेस रेट 10.10% ने वाढवून 10.25% केला आहे.

तीन वर्षांचा MCLR 10 बेसिस पॉइंटने वाढला -एसबीआयचा डिसेंबर 2023 साठीचा एमसीएलआर दर 8% आणि 8.85% दरम्यान होता. ओव्हरनाइट एमसीएलआर दर 8% निर्धारित करण्यात आला आहे. एक महिना आणि तीन महिन्यासाठी एमसीएलआर दर 8.15% वरून 8.20% करण्यात आला आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर 10 बीपीएसने वाढून 8.55% झाला आहे. ग्राहकांच्या लोनशी संबंधित एका वर्षाचा एमसीएलआर 8.55% वरून 10 बीपीएसने वाढवून 8.65% करण्यात आला आहे. दोन वर्ष आणि तीन वर्षांच्या एमसीएलआरमध्येही 10 बेस‍िस प्‍वाइंटची वाढ झाली आहे. तो वाढून आता 8.75% आणि 8.85% झाला आहे.

याशिवाय, बीपीएलआरमध्येही 15 बेस‍िस प्‍वाइंटची वाढ करण्यात आली असून तो वाढवून 15 टक्के करण्यात आला आहे. हा बदलही 15 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहे. एसबीआयने नुकतेच होम लोनवरील व्याजदरात 65 बेस‍िस प्‍वाइंटपर्यंतची घट करून स्‍पेशल फेस्‍ट‍िव्ह सीझन ऑफर दिली होती. ही ऑफर 31 डिसेंबर, 2023 पर्यंत व्हॅलीड असेल. बँकेकडून होमलोन 8.4% दराने दिले जात आहे. याशिवाय, ग्राहकांना SBI टॉप-अप हाउस लोनवर 8.9% सवलतीचा दर देखील मिळू शकतो. अर्थात 1 जानेवारीपासून आपल्याला गृहकर्जासाठी अधिक व्याज द्यावे लागणार आहे. 

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाएसबीआयबँकिंग क्षेत्र