Lokmat Money >बँकिंग > उरले काही दिवस; आतापर्यंत 2000 रुपयांच्या किती नोटा बँकेत परत आल्या, पाहा...

उरले काही दिवस; आतापर्यंत 2000 रुपयांच्या किती नोटा बँकेत परत आल्या, पाहा...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनातून बाद झालेल्या ₹ 2000 च्या नोटांबाबत नवीन माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 09:39 PM2023-09-01T21:39:08+5:302023-09-01T21:39:18+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनातून बाद झालेल्या ₹ 2000 च्या नोटांबाबत नवीन माहिती दिली आहे.

A few days left; How many Rs 2000 notes have returned to the bank so far, see... | उरले काही दिवस; आतापर्यंत 2000 रुपयांच्या किती नोटा बँकेत परत आल्या, पाहा...

उरले काही दिवस; आतापर्यंत 2000 रुपयांच्या किती नोटा बँकेत परत आल्या, पाहा...


चलनातून बाद झालेल्या ₹ 2000 च्या नोटांबाबत नवीन माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, आतापर्यंत 3.32 लाख कोटी रुपयांच्या 2,000 रुपयांच्या नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या आहेत. म्हणजेच, 2000 च्या सुमारे 93 टक्के नोटा बाजारातून बँकांकडे परत आल्या आहेत. दरम्यान, लोकांकडे 2000 रुपयांच्या नोटा परत करण्यासाठी अजून एक महिना बाकी आहे. 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये परत करू शकतात. त्यामुळे या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आकडा आणखी वाढू शकतो.

आरबीआयने सांगितले की, 31 ऑगस्ट पर्यंत बाजारात सुमारे 0.24 लाख कोटी रुपयांच्या 2000 च्या नोटा आहेत. विशेष बाब म्हणजे बँकिंग व्यवस्थेत आलेल्या 3.32 लाख कोटी रुपयांच्या 2 हजारांच्या नोटांपैकी 87 टक्के नोटा सर्वसामान्यांनी जमा केल्या आहेत. तर, 13 टक्के कमी मूल्याच्या बिलांसह देवाणघेवाण झाली. आरबीआयने सर्वसामान्यांना आवाहन केले आहे की, त्यांना सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये 2000 च्या नोटा जमा करण्याची संधी आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा कराव्यात.

या दिवशी मुदत संपेल
19 मे रोजी रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. बँकांकडून मिळालेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर आतापर्यंत 3.32 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. लोकांकडे अजूनही 0.24 लाख कोटी रुपये किंवा 24,000 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा आहेत, ज्या एकूण नोटांच्या सात टक्के आहे. 

Web Title: A few days left; How many Rs 2000 notes have returned to the bank so far, see...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.