Lokmat Money >बँकिंग > 'या' सरकारी बँकेनं आणली जबरदस्त ऑफर, स्वस्तात मिळतंय होम लोन; ३१ मार्चपर्यंत फायदा

'या' सरकारी बँकेनं आणली जबरदस्त ऑफर, स्वस्तात मिळतंय होम लोन; ३१ मार्चपर्यंत फायदा

आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण घरांच्या किंमती पाहता अनेकदा आपल्याला बँकांकडून कर्ज घ्यावं लागतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 03:43 PM2024-03-20T15:43:25+5:302024-03-20T15:47:40+5:30

आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण घरांच्या किंमती पाहता अनेकदा आपल्याला बँकांकडून कर्ज घ्यावं लागतं.

A great offer by bank of india government bank cheap home loan Avail till 31st March | 'या' सरकारी बँकेनं आणली जबरदस्त ऑफर, स्वस्तात मिळतंय होम लोन; ३१ मार्चपर्यंत फायदा

'या' सरकारी बँकेनं आणली जबरदस्त ऑफर, स्वस्तात मिळतंय होम लोन; ३१ मार्चपर्यंत फायदा

Home Loan: आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण घरांच्या किंमती पाहता अनेकदा आपल्याला बँकांकडून कर्ज घ्यावं लागतं. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनं होमलोनवर स्वस्त व्याजदर जाहीर केले आहेत. बँक ऑफ इंडियानं गृहकर्जावरील व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी केले असून ते 8.45 टक्क्यांवरून 8.30 टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली आहे. देशातील दोन सर्वात मोठ्या बँका, एसबीआय आणि एचडीएफसी बँकेच्या तुलनेत कमी व्याजदरात होम लोन देत असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. ग्राहकांना ही ऑफर 31 मार्च 2024 पर्यंत मिळणार आहे.
 

एमएलसीआर म्हणजे काय?आरबीआयनं 1 एप्रिल 2016 एमएलसीआर लागू केला होता. हा किमान लोन रेट आहे ज्याच्या खाली कोणत्याही बँकेला कर्ज देण्याची परवानगी नाही. ठेवींचे दर, रेपो दर, परिचालन खर्च आणि रोख राखीव प्रमाण राखण्याची किंमत यासह एमएलसीआर ठरवताना विविध घटक विचारात घेतले जातात. रेपो दरातील बदलांचा एमएलसीआर दरावर परिणाम होतो. एमएलसीआरमधील बदल कर्जाच्या व्याजदरावर परिणाम करतात, ज्यामुळे कर्जदारांचा ईएमआय वाढतो किंवा कमी होतो.
 

रुफटॉप सोलार पॅनल
 

रूफटॉप सोलर पॅनेलसाठी 7 टक्के विशेष व्याजदराची सुविधा देखील देत असल्याची माहिती बँक ऑफ इंडियानं दिली आहे. याशिवाय त्यावर प्रोसेसिंग फीदेखील माफ करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी खर्चाच्या 95 टक्के कर्ज घेता येते. यामध्ये, जास्तीत जास्त पेमेंट पीरिअड120 महिने आहे.

Web Title: A great offer by bank of india government bank cheap home loan Avail till 31st March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.