Join us  

देशातील 11 सरकारी बँकांचा मोठा विक्रम; SBI-PNB-BOM चे ग्राहकही खूश होतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 10:09 AM

या बँकांनी दुप्पटहून अधिक 34,774 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSB) अथवा सरकारी बँका त्यांच्या नफ्याच्या बाबतीत सातत्याने विक्रम नोंदवत आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक आधारावर सरकारी बँकांनी विक्रमी नफा  कमावा आहे. या बँकांनी दुप्पटहून अधिक 34,774 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. या बँकांनी जारी केलेल्या पहिल्या तिमाहीतील आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षातील एप्रिल-जून पर्यंतच्या कालावधी दरम्यान 12 पीएसयू बँकांनी एकूण 15,306 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.

एनआयएम 3 टक्क्यांहून अधिक -या कालावधीतील उच्च-व्याजदरामुळे बँकांना चांगले निव्वळ व्याज मार्जिन (NIM) मिळविण्यास मदत झाली. अधिकांश बँकांचे एनआयएम (NIM) 3 टक्क्यांहून अधिक होते. पहिल्या तिमाहीत पुण्याच्या बँक ऑफ महाराष्ट्रचे एनआयएम सर्वाधिक, म्हणजेच 3.86 टक्के आहे. यानंतर, सेंट्रल बँकेचे एनआयएम 3.62 टक्के आणि इंडियन बँकेचे 3.61 टक्के राहिले. समीक्षाधीन कालावधीत चार कर्जदारांनी 100 टक्क्यांहून अधिक नफा कमावला.

PNB नं नोंदवली सर्वाधिक वृद्धी -पंजाब नॅशनल बँकेने (PNB) सर्वाधिक वृद्धी नोंदवत 1,255 कोटी रुपांचा नफा नोंदवला आहे. या बँकेच्या गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीतील नफा 308 कोटी रुपये एवढा होता. एसबीआयला आतापर्यंतच्या कुठल्याही तिमाहीच्या तुलनेत सर्वाधिक फायदा झाला आहे. एसबीआयने 178 टक्क्यांच्या वृद्धीसह 16,884 कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला आहे. जो सर्वच्या सर्व PSB ने कमावलेल्या एकूण लाभाच्या जवळपास 50 टक्के आहे.

इतर पाच पीएसबींनी 50 ते 100 टक्क्यांदरम्यान वाढ नोंदवली आहे. यात बँक ऑफ महाराष्ट्र आघाडीवर आहे. या बँकेचा निव्वळ नफा 95 टक्क्यांनी वाढून 882 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यानंतर बँक ऑफ बडोदाचा निव्वळ नफा 88 टक्क्यांनी वाढून 4,070 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यूको बँकेचे प्रॉफीट 81 टक्क्यांच्या वृद्धीसह 581 टक्क्यांवर पोहोचले आहे. 12 बँकांपैकी केवळ दिल्ली येथील पंजाब अँड सिंध बँकेच्याच निव्वळ नफ्यात घसरण नोंदवण्यात आली आहे. 

टॅग्स :बँकबँक ऑफ इंडियाबँक ऑफ महाराष्ट्रबँकिंग क्षेत्र