आपल्या सर्वांनाच बऱ्याचदा काही महत्त्वाच्या कामासाठी पैशांची गरज भासते आणि त्यावेळी आपल्याकडे पैशांची चणचण असते. मुलांचं शिक्षण, लग्न किंवा वैद्यकीय खर्च अशा अनेक गोष्टींसाठी पैसा खर्च होतो. अशा वेळी आपण मित्रांची मदत घेतो, पण त्यालाही मर्यादा असते. वैयक्तिक कर्जाच्या अटीही कठोर आहेत आणि व्याजदरही खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत, एक कर्ज आहे जे कोणत्याही अडचणीशिवाय आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकते. यासाठी CIBIL ची कोणतीही अडचण नाही, उत्पन्नाचा पुरावा आवश्यक नाही आणि व्याजदर देखील खूप कमी आहे. आपण गोल्ड लोनबाबत बोलत आहोत.गोल्ड लोन म्हणजे काय?गोल्ड लोन सहसा अल्पकालीन गरजांसाठी घेतलं जातं. जसं मुलांचं लग्न, शिक्षण आणि कुटुंबातील कोणतीही आपत्कालीन परिस्थिती. सामान्यतः गोल्ड लोनवरील व्याजदर १० टक्क्यांपेक्षा कमी असतो. कारण, हे कर्ज बँका आणि एनबीएफसीसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. या कर्जाचा लाभ घेण्यासाठी घरात ठेवलेलं सोनं गहाण ठेवावं लागतं, त्यात कोणतीही अडचण येत नाही, कारण बँकेकडे असलेलं सोनं घरापेक्षा अधिक सुरक्षित असतं.सिबिलची गरज नाहीगोल्ड लोन घेण्यासाठी CIBIL रेकॉर्ड तपासण्याची गरज नाही. तुमचा सिबिल खराब असला तरी तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. परंतु या कर्जाद्वारे तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करून तुमचा सिबिल सुधारू शकता. गोल्ड लोन लगेच मिळतं. कर्ज घेण्यासाठी जास्तीत जास्त १-२ दिवस लागतात. गोल्ड लोन अंतर्गत, ५० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेतलं जाऊ शकतं आणि तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे कर्ज वापरू शकता.
एक असं लोन ज्यासाठी Cibil score ची गरज लागत नाही; ना इन्कम प्रुफ आणि व्याजही कमी, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 10:33 AM