Join us  

सारखा सारखा CIBIL स्कोअर चेक करताय? मग पडू शकतं महागात, होऊ शकतं 'हे' मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 12:48 PM

जेव्हा तुम्ही कोणत्याही कर्जासाठी, फायनान्स किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा बँक प्रथम तुमचा सिबिल स्कोअर तपासते. हा सिबिल स्कोअर सर्वांसाठी महत्त्वाचा असतो.

जेव्हा तुम्ही कोणत्याही कर्जासाठी, फायनान्स किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा बँक प्रथम तुमचा सिबिल स्कोअर तपासते. कर्ज किंवा आर्थिक बाबींसाठी अप्रुव्हल मिळविण्यात CIBIL स्कोअरची भूमिका महत्त्वाची असते. चांगला स्कोअर तुम्हाला आकर्षक दराने कर्ज मिळवून देऊ शकतो. सिबिल स्कोअर तपासणं आता पूर्वीपेक्षा खूप सोपं झालंय. आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे एका मिनिटात ते सहज तपासू शकता. पण जरा थांबा....

पण तुम्हाला माहिती आहे का की वारंवार सिबिल स्कोअर तपासल्यानं तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि त्याचा फटका तुम्हाला सहन करावा लागू शकतो. सिबिल स्कोअर वारंवार तपासून तुम्हाला कोणतं नुकसान होऊ शकतं आणि तुम्ही तो कोणत्या अॅपद्वारे चेक करू शकता हे आपण पाहूया.

कसा खराब होतो सिबिल?जर तुमचा सिबिल स्कोअर ७०० किंवा त्याहून अधिक असेल तर तो चांगला मानला जातो आणि कर्ज मिळवणंही तुलनेनं सोपं होतं. पण तुमचा सिबिल स्कोर खराब झाला तर तुमची समस्या वाढू शकते. सिबिल स्कोर अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. परंतु याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुम्ही घेतलेलं कोणतंही कर्ज किंवा क्रेडिट वेळेवर भरताय किंवा नाही. दुसरीकडे, जर तुम्ही वारंवार सिबिल स्कोअर तपासत असाल, तर त्याचा तुमच्या स्कोअरवरही परिणाम होऊ शकतो आणि तो कमी होतो.

सारखा सिबिल तपासू नकासर्वसाधारणपणे असं दिसून येतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं असतं तेव्हा तो एकाच वेळी अनेक बँकांशी संपर्क साधतो. त्यावेळी त्याचा सिबिल स्कोअर बँकेकडून तपासला जातो. अशा प्रकारे, जेव्हा वेगवेगळ्या बँका एखाद्याचा सिबिल स्कोअर तपासतात तेव्हा तो कमी होतो. जेव्हा बँका सिबिल स्कोअर तपासतात तेव्हा तो हार्ड सिबिल असतो. दुसरीकडे, जेव्हा युझर अॅपच्या मदतीनं स्कोअर तपासतात, तेव्हा ते सॉफ्ट स्कोअर चेकिंग असतो. या दोन्ही प्रकारे सिबिल स्कोअर तपासल्यास, तो कमी होण्याची शक्यता असते.

निरनिराळ्या अॅपच्या मदतीनं सिबिल तपासणं टाका आजकाल, बहुतेक लोक त्यांचा स्कोअर किती चांगला झाला आहे हे पाहण्यासाठी स्मार्टफोनच्या मदतीनं वेगवेगळ्या अॅप्सद्वारे त्यांचे सिबिल स्कोअर पुन्हा पुन्हा तपासत राहतात. पण असं केल्यानं तुमचा स्कोअर खराब होण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या अॅप्सद्वारे सिबिल स्कोअर तपासल्यानं तुमचे दोन प्रकारचे नुकसान होऊ शकते.

पहिले म्हणजे, तुमचा सिबिल स्कोर खराब होईल आणि दुसरा, तुमचा डेटा त्या सर्व अॅप्सवर जाईल. यामुळे तुमची ऑनलाइन फसवणूक होण्याचा धोकाही वाढतो. तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर तपासायचा असेल, तर तो फक्त अधिकृत अॅप्सपैकी एकाद्वारे तपासा आणि जेव्हा खूप गरज असेल तेव्हाच तो तपासा.

टॅग्स :पैसाबँक