Lokmat Money >बँकिंग > Credit Card चं बिल भरण्याचं टेन्शन आलंय? या सोप्या पद्धतीनं सोडवू शकता समस्या

Credit Card चं बिल भरण्याचं टेन्शन आलंय? या सोप्या पद्धतीनं सोडवू शकता समस्या

अलीकडच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर प्रचंड वाढला आहे. आता बहुतांश लोक डेबिट कार्डसह क्रेडिट कार्डचा बरेचदा वापर करताना दिसतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 03:33 PM2023-06-11T15:33:14+5:302023-06-11T15:34:08+5:30

अलीकडच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर प्रचंड वाढला आहे. आता बहुतांश लोक डेबिट कार्डसह क्रेडिट कार्डचा बरेचदा वापर करताना दिसतात.

Are you stressed about paying your credit card bill You can solve the problem in this simple way | Credit Card चं बिल भरण्याचं टेन्शन आलंय? या सोप्या पद्धतीनं सोडवू शकता समस्या

Credit Card चं बिल भरण्याचं टेन्शन आलंय? या सोप्या पद्धतीनं सोडवू शकता समस्या

Credit Card Bill Payments: अलीकडच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर प्रचंड वाढला आहे. आता बहुतांश लोक डेबिट कार्डसह क्रेडिट कार्डचा बरेचदा वापर करताना दिसतात. क्रेडिट कार्ड युझर्सना अनेकदा मोठी बिले भरावी लागतात. अनेक वेळा क्रेडिट कार्डमुळे लोकांचे खर्च जास्त होतात. यानंतर क्रेडिट कार्डचं मोठं बिल भरताना अडचणींचा सामना करावा लागतो. क्रेडिट कार्ड हे खरे तर कर्जाचा एक प्रकार आहे.

जर क्रेडिट कार्डाचं पेमेंट वेळेत जमा केलं नाही तर तुम्हाला व्याज देखील द्यावं लागेल. तुम्हाला कार्डावर घेतलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी वेळ दिला जातो. याला ग्रेस पिरियड म्हणतात. या वाढीव कालावधीत कोणतेही व्याज द्यावं लागणार नाही. पण त्यानंतर व्याज मिळू लागतं. तुम्हाला तुमचं क्रेडिट कार्ड बिल भरण्यात अडचण येत असल्यास, घाबरू नका. आज आम्ही तुम्हाला एक्सपर्ट्सच्या अशा पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही सहज क्रेडिट बिल भरू शकाल.

असं फेडा बिल
जर तुम्ही तुमचं क्रेडिट कार्डाचं बिल वेळत भरलं नाही आणि ते ओव्हरड्यू झालं तर त्याचा परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होईल. यामुळे तुम्हाला भविष्यात लोन मिळणं कठीण होऊ शकतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला बिल भरण्यास समस्या येत असल्यास ते ईएमआयमध्ये रूपांतरित करा. यासह, तुम्हाला क्रेडिट कार्डची संपूर्ण शिल्लक एकाच वेळी भरावी लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला ते बिल भरणं सोपं जाईल.

बॅलन्स करा ट्रान्सफर
जर तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. तुम्ही एका क्रेडिट कार्डची शिल्लक दुसऱ्या क्रेडिट कार्डमध्ये ट्रान्सफर करू शकता. यामुळे तुम्हाला बिल भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल. यासाठी तुम्हाला व्याज द्यावं लागणार नाही.

हादेखील पर्याय
तुम्ही लोन घेऊन क्रेडिट कार्डचे बिलही भरू शकता. तुम्ही एफडी किंवा पीपीएफ किंवा अशा कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यावर कर्जाची सुविधा मिळते. तुम्ही येथून कर्ज घेऊ शकता. यामुळे तुमचं बजेट बिघडणार नाही. याशिवाय, क्रेडिट कार्डाचं बिल भरण्यासाठी तुम्ही टॉप-अप कर्ज देखील घेऊ शकता. टॉप अप कर्जामध्ये, तुमच्या आधीच चालू असलेल्या कर्जावर बँकेकडून अतिरिक्त रक्कम दिली जाते. ही एक प्रकारची अॅड ऑन सुविधा आहे.

Web Title: Are you stressed about paying your credit card bill You can solve the problem in this simple way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.