Join us  

रेपो दर वाढताच HDFC, SBI सह अन्य बँकांचा ग्राहकांना झटका; वाढणार कर्जाचा हप्ता 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2022 9:27 AM

गेल्या 5 महिन्यांत, HDFC ने एकूण 7 वेळा दर वाढवले ​​आहेत.

गृहकर्ज देणारी देशातील आघाडीची कंपनी एचडीएफसी लिमिटेडने सणासुदीच्या काळातच आपल्या ग्राहकांना पुन्हा झटका दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची (bps) वाढ केली. त्यानंतर रेपो दर 5.9 टक्क्यांवर पोहोचले. यानंतर एचडीएफसी लिमिटेडने (HDFC Ltd) शुक्रवारी कर्जदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली. गेल्या 5 महिन्यांत, HDFC ने एकूण 7 वेळा दर वाढवले ​​आहेत. याशिवाय अन्य बँकांनीही आपल्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.व्याजदर वाढल्याने एचडीएफसीकडून गृहकर्ज घेणाऱ्यांच्या ईएमआयमध्ये वाढ होईल. RBI च्या रेपो दरात वाढ केल्यानंतर आता एचडीएफसी, एसबीआयसह अन्य बँकांनीही आपले व्याजदर वाढवले आहेत.आजपासून नवे दर“HDFC ने हाऊसिंग लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) 50 बेस पॉइंट्सने वाढवले ​​आहे. ही दरवाढ 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे," असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.अन्य बँकांनीही केली वाढएसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, EBLR आणि रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये 0.50-0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. यानंतर हे दर आता अनुक्रमे 8.55 टक्के आणि 8.15 टक्के झाले आहेत. ही वाढ आजपासूनच लागू झाली आहे. तर दुसरीकडे बँक ऑफ इंडियानेही RBLR 8.75 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. ICICI बँकेचा EBLR 9.60 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

टॅग्स :एसबीआयएचडीएफसीभारतीय रिझर्व्ह बँक