Join us  

Personal Loan घेण्यापूर्वी बँकेला विचारा हे 3 प्रश्न; अन्यथा होईल पश्चाताप...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 7:20 PM

अडीअडचणीला पर्सनल लोन खूप कामी येते.

Personal Loan Info : आजच्या काळात पर्सनल लोन हे एक अतिशय महत्त्वाचे आर्थिक साधन बनले आहे. पर्सनल लोनची खास गोष्ट म्हणजे तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी, प्रवासासाठी किंवा कोणत्याही वैयक्तिक कामासाठी या कर्जाचा वापर करू शकता. पण, पर्सनल लोन घेण्यापूर्वी तुम्ही बँकेला काही प्रश्न विचारलेच पाहिजेत. यामुळे कर्जाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता कमी होईल.

फिक्स्ड की फ्लोटिंग व्याज दर?पर्सनल लोन घेण्यापूर्वी बँकेला विचारा की, तुमच्या कर्जावरील व्याजदर फिक्स्ड आहे की, फ्लोटिंग आहे. फिक्स्ड व्याजदर म्हणजे कर्ज घेताना ठरवलेले व्याज कर्जाच्या संपूर्ण कालावधीसाठी एकच राहते. आरबीआय जेव्हा रेपो दर बदलते, तेव्हा बदलणारा व्याजदर हा फ्लोटिंग व्याजदर असतो. फ्लोटिंग व्याजदराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, रेपो दर कमी झाल्यास व्याजदर कमी होतो. पण रेपो दर वाढल्यावर तो वाढतो. रेपो रेटचा निश्चित व्याजावर कोणताही परिणाम होत नाही, तो कर्जाच्या संपूर्ण कालावधीत सारखाच राहतो.

कर्जाचा कालावधीपर्सनल लोन घेण्यापूर्वी तुम्ही बँकेकडून कर्जाच्या कालावधीबद्दल जाणून घ्या. कर्जाची परतफेड करण्यासाठी कमाल आणि किमान कालावधी किती आहे? सामान्यतः वैयक्तिक कर्जाचा कालावधी 6 महिने ते 8 वर्षे असतो. दीर्घ कालावधीसाठी कर्ज घेतल्यानं तुमची EMI रक्कम कमी होईल. परंतु यासाठी तुम्हाला संपूर्ण कार्यकाळात कर्जाची परतफेड करावी लागेल.

फी आणि चार्जेसप्रीपेमेंट आणि प्रोसेसिंग फीसह इतर शुल्कांबद्दल विचारणा करा. अनेक बँका आणि NBFC कंपन्या निर्धारित कालावधीपूर्वी वैयक्तिक कर्ज परत करण्यासाठी प्रीपेमेंट शुल्क आकारतात. तुम्हाला प्रीपेमेंट शुल्काविषयी आधीच माहिती असेल तर ते तुमच्यासाठी सोपे होईल.

टॅग्स :बँकपैसागुंतवणूक