नवी दिल्ली : जर तुम्ही एटीएम कार्डचा वापर (ATM Card Use) करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, बँक तुम्हाला 5 लाख रुपयांचा लाभ देऊ शकते. मात्र याबाबत अनेक बँक ग्राहकांना माहिती नसते. बँकेने एटीएम कार्ड दिल्यानंतर काही सेवा प्रदान करते. या मोफत सेवांपैकी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे विमा. अनेक लोकांना एटीएमचे नियम माहीत नाहीत.
एटीएम कार्ड जारी करताच ग्राहकाला अपघाती विमा ( Accidental Insurance)मिळतो. यासाठी कार्डहोल्डरच्या कुटुंबियांना अर्ज करणे आवश्यक असते. जर तुम्ही क्लेम (ATM Insurance Claim) केले नाही तर काहीच मिळत नाही. आरबीआयच्या नियमांनुसार, कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेचे एटीएम कार्ड धारकांना विमा मिळतो. पण ग्राहकाने एटीएम कार्ड किमान 45 दिवसांपूर्वी वापरत असणे आवश्यक आहे.
म्हणजेच एटीएम कार्ड हाती मिळाल्यानंतर 45 दिवसानंतर अपघात झाल्यास विम्यासाठी ग्राहक क्लेम करु शकतो. एटीएम कार्डच्या विम्यावर किती रक्कम मिळेल, हे सर्व एटीएम कार्डच्या कॅटगरीवर अवलंबून असते. बँक कार्डधारकांना वेगवेगळ्या कॅटगरीनुसार विमा देते. कार्ड कॅटगरी क्लासिक, प्लॅटिनम आणि सामान्य आहे. सामान्य मास्टरकार्डवर 50,000 रुपये, क्लासिक एटीएम कार्डवर 1 लाख रुपये, व्हिसा कार्डवर 1.5 ते 2 लाख रुपये आणि प्लॅटिनम कार्डवर 5 लाख रुपयांचा विमा मिळतो.
एटीएम कार्ड वापरणाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत विमा उपलब्ध आहे. दुसरीकडे, जर एका हाताला किंवा एका पायाला इजा झाली असेल, तर त्या प्रकरणात 50000 रुपयांपर्यंतची विम्याची रक्कम उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला बँकेकडे अर्ज करावा लागेल. कार्डधारकाच्या नॉमिनीला अर्ज बँकेत जमा करावा लागतो.