Join us  

Bank Holidays: बँकेचं काम आजच उरका! ४ दिवस पुन्हा सुट्ट्या; कोण-कोणत्या दिवशी बँका बंद वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 12:23 PM

ऑगस्ट महिना म्हटलं की लागोपाठ सुट्ट्या येतात आणि बँक हॉलीडेंची संख्या या महिन्यात अधिक असल्यानं ग्राहकांची कामंही रखडण्याची शक्यता असते. आता १५ ऑगस्टपूर्वी बँकांना एकाच वेळी अनेक सुट्या होत्या.

ऑगस्ट महिना म्हटलं की लागोपाठ सुट्ट्या येतात आणि बँक हॉलीडेंची संख्या या महिन्यात अधिक असल्यानं ग्राहकांची कामंही रखडण्याची शक्यता असते. आता १५ ऑगस्टपूर्वी बँकांना एकाच वेळी अनेक सुट्या होत्या. त्यामुळे तुमचीही बँकेशी निगडीत कामं रखडली असतील. आता तुमची कामं रखडलेली असतील तर लवकरात लवकर मार्गी लावा कारण ऑगस्टच्या उरलेल्या दिवसात बँकांच्या सुट्ट्या शिल्लक आहेत. वेगवेगळ्या प्रदेशानुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असल्या तरी अशा स्थितीत तुमच्या क्षेत्रातील बँका कोणत्या दिवशी बंद राहतील ते आधी पाहून घेणं गरजेचं आहे. जेणेकरुन तुम्हाला बँकेचं काम मार्गी लावण्यासाठी नियोजन करण्यात मदत होईल.

उद्यापासून पुन्हा बँक हॉलीडेया आठवड्यात जन्माष्टमीचा सण आहे, त्यानिमित्त देशातील अनेक भागात बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्टला जन्माष्टमीनिमित्त भुवनेश्वर, देहरादून, कानपूर, लखनौ या प्रदेशातील बँका बंद राहणार आहेत. १९ तारखेला कृष्ण जयंतीनिमित्त अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, जयपूर, जम्मू, पटना, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील. दुसरीकडे, २० तारखेला श्रीकृष्ण अष्टमीनिमित्त हैदराबादमधील बँका बंद राहणार आहेत. २२ रोजी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. 

ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यातही सुट्ट्यात्याचबरोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साप्ताहिक सुट्ट्यांसह एकूण ४ दिवस बँका बंद राहणार आहेत. २७ आणि २८ ऑगस्ट रोजी बँकेला साप्ताहिक सुट्टी असेल. दुसरीकडे श्रीमंत शंकरदेव तिथीनिमित्त गुवाहाटीमध्ये २९ ऑगस्टला आणि गणेश चतुर्थीनिमित्त अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई आणि हैदराबादमध्ये ३१ ऑगस्टला बँका बंद राहतील. 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रएसबीआय