ऑक्टोबर महिना सुट्ट्यांचा सुकाळ घेऊन आला होता. आता नोव्हेंबर दुष्काळ घेऊन येणार आहे. आरबीआयने बँक हॉलिडेंची लिस्ट जारी केली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुट्ट्यांवर सुट्ट्या उपभोगणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात फक्त आठवडी सुट्ट्यांवरच समाधान मानावे लागणार आहे.
गेल्या काही महिन्यांत बँक कर्मचाऱ्यांची चंगळ झाली होती. परंतू, नोव्हेंबर सर्वात कमी सुट्ट्या घेऊन आला आहे. ३० दिवसांच्या या महिन्यात महाराष्ट्रात शनिवार, रविवार मिळून केवळ ६ दिवस बँका बंद राहणार आहेत. 1, 8, 11 आणि १३ नोव्हेंबरला बँकांना त्या त्या राज्यांनुसार सुट्टी असणार आहे. परंतू, 6, 12, 13, 20, 26 आणि 27 नोव्हेंबरला साप्ताहिक सुट्टी असणार आहे. दिवाळीमुळे ऑक्टोबरमध्ये देशभरात विविध राज्यांच्या पकडून २१ दिवस बँका बंद होत्या.
असे आहे सुट्ट्यांचे टेबल....१ नोव्हेंबर - कर्नाटक स्थापना दिवस, बेंगळुरू, इम्फाळ६ नोव्हेंबर - रविवार साप्ताहिक सुट्टी (महाराष्ट्र)८ नोव्हेंबर - गुरु नानक जयंती/कार्तिका पौर्णिमा भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद11 नोव्हेंबर - कनकदास जयंती/बांगला महोत्सव बेंगळुरू, शिलाँग12 नोव्हेंबर - दुसरा शनिवार साप्ताहिक सुट्टी (महाराष्ट्र)13 नोव्हेंबर - Seng Kutsnem/ रविवार Shillong (महाराष्ट्र)20 नोव्हेंबर - रविवार साप्ताहिक सुट्टी (महाराष्ट्र)२६ नोव्हेंबर - चौथा शनिवार साप्ताहिक सुट्टी (महाराष्ट्र)27 नोव्हेंबर - रविवार साप्ताहिक सुट्टी (महाराष्ट्र)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला त्यांच्या वेबसाइटवर बँक हॉलिडे लिस्ट अपडेट करते. तुम्ही ते RBI च्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.