Bank Holiday List : ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या आहेत. सणासुदीला सुरुवात होत असल्याने ऑक्टोबर महिना हा हॉलिडेंचा असणार आहे. या काळात बँका बंद असणार आहेत. यामुळे आतापासूनच बँकांच्या कामांचे नियोजन करून ठेवावे लागणार आहे. दिवाळीचा फराळ, खरेदी आणि बरेच खर्च या महिन्यात असणार आहेत. यासाठी पैशांचे व्यवहारही मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहेत. या हॉलिडे लिस्टमध्ये कोणत्या राज्यात कधी कधी सुट्टी असेल हे देण्यात आले आहे.
आरबीआयने बँकेची हॉलिडे लिस्ट जारी केलेली असते. यानुसार ऑक्टोबरमध्ये १५ दिवस बँका बंद असणार आहेत. यात दुसरा आणि चौथ्या शनिवारची सुट्टी देखील धरलेली आहे.
आजच्या काळात बँक ह़ॉलिडेचा एवढा फरक पडत नाही. परंतू, कंपन्या, व्यवसाय यांना या हॉलिडेंचा फरक जाणवतो. सामान्या माणसाकडे एटीएम, युपीआयची सोय असल्याने कॅश हवी तर कॅश नाहीतर डिजिटल अशा प्रकारात पैशांची देवाणघेवाण करता येते. उद्योजकांना अनेकदा कॅश बँकांत भरायची असल्याने अडचण होते.
अशी आहे हॉ़लिडे लिस्ट1 ऑक्टोबर - जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका2 ऑक्टोबर - देशभरात महात्मा गांधी जयंती आहे3 ऑक्टोबर - शारदीय नवरात्री आणि महाराजा अग्रसेन जयंती जयपूर6 ऑक्टोबर - रविवार 10 ऑक्टोबर - महा सप्तमी आगरतळा, गुवाहाटी, कोहिमा, कोलकाता11 ऑक्टोबर - महानवमी इम्फाळ, इटानगर, कोहिमा, कोलकाता, गुवाहाटी, अगरतळा, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, पाटणा, रांची, शिलाँग.12 ऑक्टोबर - दुसरा शनिवार, दसरा13 ऑक्टोबर -रविवार 14 ऑक्टोबर - दुर्गा पूजा (दसैन) गंगटोक16 ऑक्टोबर - लक्ष्मीपूजन आगरतळा, कोलकाता17 ऑक्टोबर - महर्षि वाल्मिकी जयंती शिमला, बंगलोर, गुवाहाटी20 ऑक्टोबर - रविवार 26 ऑक्टोबर - चौथा शनिवार27 ऑक्टोबर - रविवार 31 ऑक्टोबर - नरक चतुर्दशी, सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि दीपावली अहमदाबाद, अजवाल, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, हैदराबाद, गुवाहाटी, इटानगर, जयपूर, कानपूर, कोची, कोहिमा, कोलकाता, लखनौ, नवी दिल्ली, पणजी, पटना, रायपूर, रांची, शिमला, तिरुवनंतपुरम