Lokmat Money >बँकिंग > Bank Holiday On Eid: ३१ मार्च रोजी ईदच्या दिवशी बँका खुल्या राहणार की बंद? काय म्हटलंय RBI नं

Bank Holiday On Eid: ३१ मार्च रोजी ईदच्या दिवशी बँका खुल्या राहणार की बंद? काय म्हटलंय RBI नं

Bank Holiday On March 31st 2025:  ३१ मार्च रोजी ईद साजरी केली जाणार आहे, परंतु हा दिवस आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अखेरचा कामकाजाचा दिवस देखील आहे. अशा परिस्थितीत बँका सुरू राहतील की बंद राहतील, याबाबत अनेकजण संभ्रमात आहेत.

By जयदीप दाभोळकर | Updated: March 28, 2025 12:21 IST2025-03-28T12:19:15+5:302025-03-28T12:21:45+5:30

Bank Holiday On March 31st 2025:  ३१ मार्च रोजी ईद साजरी केली जाणार आहे, परंतु हा दिवस आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अखेरचा कामकाजाचा दिवस देखील आहे. अशा परिस्थितीत बँका सुरू राहतील की बंद राहतील, याबाबत अनेकजण संभ्रमात आहेत.

Bank Holiday On Eid 31st march financial year end Will banks be open or closed What RBI said | Bank Holiday On Eid: ३१ मार्च रोजी ईदच्या दिवशी बँका खुल्या राहणार की बंद? काय म्हटलंय RBI नं

Bank Holiday On Eid: ३१ मार्च रोजी ईदच्या दिवशी बँका खुल्या राहणार की बंद? काय म्हटलंय RBI नं

Bank Holiday On March 31st 2025:  ३१ मार्च रोजी ईद साजरी केली जाणार आहे, परंतु हा दिवस आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अखेरचा कामकाजाचा दिवस (Last Working Day Of FY 2024-25) देखील आहे. अशा परिस्थितीत बँका सुरू राहतील की बंद राहतील, याबाबत अनेकजण संभ्रमात आहेत. तुम्हीही बँकेशी संबंधित कोणतंही महत्त्वाचं काम करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ३१ मार्च रोजी बँक खुली (Banks Open Close on 31 March) राहिल की बंद.

बँका सुरू राहणार की बंद?

ईदनिमित्त ३१ मार्चला जवळपास सर्वच राज्यांमध्ये बँका बंद  (Bank Holiday On Eid) राहणार आहेत. मात्र या दिवशी हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता देशभरातील सर्व राज्यांमध्ये बँकिंग सेवा बंद राहतील. पण विशेष म्हणजे या दिवशी सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व एजन्सी बँका सुरू राहतील, असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं दिलेत.

आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस

वास्तविक ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस (Financial Year Last working day) असून या दिवशी बँकिंग क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाची कामं हाताळली जातात. आर्थिक वर्ष व्यवस्थित बंद व्हावं यासाठी आरबीआयनं सरकारी व्यवहार करणाऱ्या बँकांना ३१ मार्च रोजी कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व सरकारी देयके, कर आणि वित्तीय नोंदींमध्ये विलंब किंवा विसंगती होऊ नये हे यामागचं उद्दीष्ट आहे.

जर तुम्ही ३१ मार्चला बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या या दिवशी खालील सेवा उपलब्ध असतील.

  • सरकारी कर भरणा : आयकर, जीएसटी, सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्क भरणं
  • पेन्शन आणि सरकारी सबसिडी : सरकारी योजनांशी जोडलेली देयकं
  • सरकारी वेतन व भत्ते : सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन व इतर देयकं
  • सरकारी योजनांशी संबंधित सार्वजनिक व्यवहार
     

१ एप्रिलला या राज्यांमध्ये बँका राहणार बंद

आर्थिक वर्ष संपत असल्यां (Last Working Day Of FY 2024-25) १ एप्रिल रोजी बँका बंद राहतील, परंतु मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश सारख्या काही राज्यांमध्ये बँकिंग सेवा सुरू राहतील.

जर तुम्हाला बँकेशी संबंधित काही महत्त्वाचं काम असेल तर ३१ मार्चला बँकेत जाण्यापूर्वी तुमची बँक उघडी आहे की नाही हे तपासून घ्या. कारण या दिवशी बहुतांश राज्यांमध्ये बँका बंद राहतील, पण सरकारी पेमेंट करणाऱ्या बँका सुरू राहतील. तर १ एप्रिल रोजी आर्थिक वर्ष संपत असल्याने बँकिंग सेवेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे बँकेचं काम अगोदरच करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळता येईल.

Web Title: Bank Holiday On Eid 31st march financial year end Will banks be open or closed What RBI said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.