Lokmat Money >बँकिंग > Bank Holidays List in December 2022: वर्षाचा अखेरचा महिना निराशा करणारा; सुट्ट्या आल्या पण शनिवार, रविवारीच...

Bank Holidays List in December 2022: वर्षाचा अखेरचा महिना निराशा करणारा; सुट्ट्या आल्या पण शनिवार, रविवारीच...

Bank Holidays December: इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगसह तुम्ही तुमची बँकिंगची बहुतांश कामे हाताळू शकता. बँकेची शाखा बंद असतानाही तुम्ही तुमची अनेक बँकिंग कामे करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 09:27 AM2022-12-01T09:27:44+5:302022-12-01T09:29:13+5:30

Bank Holidays December: इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगसह तुम्ही तुमची बँकिंगची बहुतांश कामे हाताळू शकता. बँकेची शाखा बंद असतानाही तुम्ही तुमची अनेक बँकिंग कामे करू शकता.

Bank Holidays List in December 2022: A disappointing last month of the year; Holidays came but Saturday, Sunday only... | Bank Holidays List in December 2022: वर्षाचा अखेरचा महिना निराशा करणारा; सुट्ट्या आल्या पण शनिवार, रविवारीच...

Bank Holidays List in December 2022: वर्षाचा अखेरचा महिना निराशा करणारा; सुट्ट्या आल्या पण शनिवार, रविवारीच...

आजकाल आपल्याला बँकेत जायची गरज लागत नाही. बहुतांश सर्व कामे ही मोबाईलवरूनच होतात. त्यामुळे अनेकदा बँका कधी सुरु असतात आणि कधी बंद याची माहिती मिळत नाही. जेव्हा बँकेत जाऊन काम करायचे असते तेव्हा मात्र पंचाईत होते. एकतर तेव्हा बँक बंद असल्याचे कळते किंवा बँकेकडे गेल्यावर कळते. 

आजपासून वर्षांचा अखेरचा महिना डिसेंबर सुरु झाला आहे. डिसेंबरमध्ये देशभरात विविध राज्यांत मिळून १३ दिवस बँका बंद असणार आहेत. परंतू, यात दोन सणवार शनिवार, रविवारीच आल्याने इतर दिवशी बँका सुरुच राहणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात तसा फरक पडणार नाहीय, परंतू गोव्यात पडणार आहे. चला जाणून घेऊया कधी आहेत बँक हॉलिडे...

इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगसह तुम्ही तुमची बँकिंगची बहुतांश कामे हाताळू शकता. बँकेची शाखा बंद असतानाही तुम्ही तुमची अनेक बँकिंग कामे करू शकता. ग्राहकांसाठी ऑनलाइन बँकिंग पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. यासोबतच एटीएम सेवाही सुरू राहणार आहे.
 
३ डिसेंबर : (शनिवार) : सेंट झेवियर्स फेस्ट- गोव्यात बँक बंद.
4 डिसेंबर (रविवार): देशभरात सुट्टी.
10 डिसेंबर (शनिवार): दुसरा शनिवार – देशभरातील बँका बंद राहतील.
11 डिसेंबर (रविवार): देशभरात सुट्टी आहे.
१२ डिसेंबर (सोमवार): मेघालयमध्ये पा-तागन नेंगमिंजा संगम – बँक बंद.
18 डिसेंबर (रविवार): देशभरात सुट्टी आहे.
19 डिसेंबर (सोमवार): गोवा मुक्ती दिन- गोव्यात बँक बंद.
 24 डिसेंबर (शनिवार): चौथा शनिवार- देशभरातील बँका बंद.
25 डिसेंबर (रविवार): देशभरात सुट्टी आहे.
26 डिसेंबर (सोमवार): नाताळमध्ये बँक बंद, लासुंग, नामसंग- मिझोराम, सिक्कीम, मेघालय.
29 डिसेंबर (गुरुवार): गुरु गोविंद सिंग यांच्या जयंती- चंदीगडमध्ये बँका बंद राहणार आहेत.
30 डिसेंबर (शुक्रवार): U Kiang Nangwah - मेघालयातील बँक बंद.
31 डिसेंबर (शनिवार): मिझोरममध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बँक बंद.

Web Title: Bank Holidays List in December 2022: A disappointing last month of the year; Holidays came but Saturday, Sunday only...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक