Join us  

सामान्यांच्या खिशाला कात्री; बँक ऑफ इंडिया आणि ICICIसह चार बँकांनी व्याजदर वाढवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 2:11 PM

RBIची 3 नोव्हेंबरला बैठक होणार आहे, यापूर्वीच चार मोठ्या बँकांनी व्याज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आरबीआय(RBI)ची उद्या म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीच्या दोन दिवसांपूर्वीच चार मोठ्या बँकांनी व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. आयसीआयसीआय (ICICI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ इंडिया (BOI) आणि इंडियन बँक (IB) ने 1 नोव्हेंबरपासून एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे.

एमसीएलआर तो दर असतो, ज्याच्यापेक्षा कमी दरात बँकेला कर्ज देता येत नाही. 2016 मध्ये आरबीआयने हादर सुरू केला होता. आरबीआयने या वर्षीय मे महिन्यापासून आतापर्यंत चारवेळा रेपोमध्ये 1.90 टक्के वाढ केली आहे. एप्रिलपर्यंत 6.60 फीसद रेटवर मिळणारे कर्ज आता 8 टक्क्यांवर मिळत आहे.

कोणत्या बँकेने किती वाढ केली?आयसीआईसीआय बँक: एमसीएलआरमध्ये 0.20 टक्के वाढ केील आहे. एका वर्षांचा एमसीएलआर आता 8.30 टक्के होईल. हा आधी 8.10 टक्के होता.

पंजाब नॅशनल बँक : एमसीएलआरला 0.30 टक्के वाढवले आहे. यामुळे एका वर्षांचा दर आता 8.05 टक्के होईल. हा आधी 7.75 टक्के होता. 

बँक ऑफ इंडिया: बँकेने 0.15 टक्के वाढ केली आहे. यामुळे एका वर्षांचा एमसीएलआर दर 7.95 टक्के झाला आहे. हा दर आधी 7.80 टक्के होता.

इंडियन बँक: बँकने एमसीएलआरमध्ये 0.35 टक्के वाढ केली आहे. हा दर आता 7.40 टक्के झाला आहे.

एका वर्षीत रिटेल लोनमध्ये वाढबॅंकांच्या एकूण कर्जामध्ये किरकोळ कर्जाचा वाटा 29 टक्के आहे. यापैकी बहुतांश गृहनिर्माण आणि वाहन कर्जे आहेत. वर्षभरापूर्वी त्याचा वाटा 13.2 टक्के होता. सेवा क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या कर्जात सप्टेंबरमध्ये 20 टक्के गती आली आहे. यापूर्वी यात फक्त 1.2 टक्के वाढ होती.

टॅग्स :बँकबँक ऑफ इंडियाआयसीआयसीआय बँकपंजाब नॅशनल बँक