Join us

घर,जमीन,दुकान; स्वस्तात खरेदी करा मालमत्ता, बँक ऑफ बडोदा देत आहे सुवर्णसंधी, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 10:03 PM

या सणासुदीच्या काळात घर-प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे.

Bank of Baroda Mega E-Auction: या सणासुदीच्या काळात घर-प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदा स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी देत आहे. BOB ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ई-लिलावद्वारे बँक ऑफ बडोदा स्वस्तात मालमत्ता विकणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये तुम्ही घरासाठी बोली लावू शकता.

या लिलावात बँकेकडून अनेक प्रकारच्या मालमत्तांचा लिलाव केला जात आहे. यामध्ये घरापासून ते जमिनीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार मालमत्तेसाठी बोली लावू शकता.

BOB ने ट्विट केले बँक ऑफ बडोदाने अधिकृत ट्विटमध्ये लिहिले की, तुम्हाला स्वस्त मालमत्ता खरेदी करण्याची संधी आहे. BOB 30 ऑक्टोबर 2023 रोजी एक मेगा लिलाव आयोजित करणार आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वस्तात मालमत्ता खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या शहरात प्रॉपर्टी खरेदी करू शकता. या लिलावात तुम्हाला घर, फ्लॅट, ऑफिस स्पेस, जमीन आणि औद्योगिक मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

येथून माहिती मिळवासंपूर्ण माहितीसाठी तुम्ही या लिंकवर https://www.bankofbaroda.in/e-auction/e-auction-notices चेक करू शकता.

बँक कोणत्या मालमत्तेचा लिलाव करणार?बरेच लोक बँकेकडून मालमत्तेसाठी कर्ज घेतात परंतु काही कारणांमुळे ते कर्ज फेडू शकत नाहीत. अशावेळी बँकेकडून त्यांची मालमत्ता ताब्यात घेतली जाते. अशा मालमत्तांचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. या लिलावात बँक मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते. जर तुम्ही सणासुदीच्या काळात घर घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. 

टॅग्स :व्यवसायबँकगुंतवणूक