Join us  

BOB Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या सरकारी बँकेनं कमी होम लोनचे व्याजदर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 3:47 PM

Home Loan Interest Rate: अन्य बँकांच्या तुलनेत या बँकेचे व्याजदर अतिशय कमी आहेत. पाहूया काय आहेत हे नवे दर.

Home Loan Interest Rate: बँक ऑफ बडोदा (BOB) ने शुक्रवारी गृहकर्जाचे व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करून 8.25 टक्क्यांवर आणले आहेत. यासोबतच भरावं लागणारं प्रोसेसिंग शुल्ही माफ करण्यात आलं आहे. BoB चा हा गृहकर्ज दर SBI आणि HDFC बँकेपेक्षाही कमी आहे. त्यांचे नवीन दर 8.40 टक्के आहेत. हे नवे दर येत्या सोमवारपासून लागू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील, असे बँकेने म्हटले आहे. “आमच्या गृहकर्जाचे दर आता व्यवसायातील सर्वात कमी आणि सर्वात स्पर्धात्मक दरांपैकी आहेत. आम्ही व्याजदरात 0.25 टक्के सूट देत आहोत तसेच प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ करत आहोत,” अशी प्रतिक्रिया बँकेचे महाव्यवस्थापक एचटी सोलंकी यांनी दिली.

ज्यांना आपला बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे त्यांनाही याचा लाभ घेता येईल. हे विशेष दर ग्राहकांच्या प्रोफाईलशी निगडित असल्याचंही सोलंकी यांनी सांगितलं. "या वर्षी आम्ही गृहकर्जांमध्ये जोरदार वाढ पाहिली आहे ज्यामध्ये शहरांमध्ये मजबूत मागणी आहे आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे घरांची विक्री वाढली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की या सवलतीच्या दराने आधीच उच्च मागणीला चालना मिळेल,” असे ते म्हणाले. गेल्या महिन्यात, व्याजदर वाढले असले तरी SBI आणि HDFC ने त्यांच्या फेस्टिव्हल ऑफरचा भाग म्हणून व्याजदरात 8.40 टक्क्यांपासून सूट देण्याची घोषणा केली होती.

SBI गृहकर्ज घेणाऱ्या नवीन ग्राहकांना 25 बेस पॉईंट्सपर्यंत सवलतीच्या व्याजाची ऑफर देत आहे, ज्यामुळे एंट्री लेव्हचा दर 8.40 टक्के झाला आहे आणि ही ऑफर जानेवारी 2023 पर्यंत राहील. त्याच वेळी, HDFC ने आपले व्याजदर 8.40 टक्क्यांवर आणले आहे. त्यांनी नवीन दर 20 bps ने कमी केले आहेत आणि ही ऑफर नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत वैध आहे.

टॅग्स :बँक