बँक ऑफ महाराष्ट्रने 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. कर्ज वाटण्यामध्ये सरकारी बँकांमध्ये महाराष्ट्र बँक सर्वात पुढे आहे. यात स्टेट बँकेलाही मागे टाकले आहे.
2022-23 या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रने वाटलेले एकूण कर्ज 28.62 टक्क्यांनी वाढून 1,48,216 कोटी रुपये झाले. बँक ऑफ महाराष्ट्रनंतर युनियन बँक ऑफ इंडिया या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या बँकेचा कर्ज वाढीचा दर 21.54 टक्के होता. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत 7,52,469 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले.
तिसऱ्या क्रमांकावर देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आहे. स्टेट बँकेचा कर्ज वृद्धीचा दर 18.15 टक्के राहिला आहे. SBI ने जुलै-सप्टेंबर तिमाहीत एकूण 25,47,390 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले.