Lokmat Money >बँकिंग > असं लोन ज्यावर ना प्रोसेसिंग फी, ना प्रीपेमेंट चार्ज; फीचर्स पाहाल तर Personal Loan देखील विसराल

असं लोन ज्यावर ना प्रोसेसिंग फी, ना प्रीपेमेंट चार्ज; फीचर्स पाहाल तर Personal Loan देखील विसराल

Overdraft Service : जर तुमचं बँकेत बचत खातं असेल तर तुम्हाला बँकेकडून अशी सेवा मिळते ज्याद्वारे तुमच्या पैशांची सहज व्यवस्था केली जाते आणि त्या बदल्यात तुमच्याकडून कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जात नाही. पाहा कोणती आहे ही सुविधा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:28 IST2024-12-26T10:28:33+5:302024-12-26T10:28:33+5:30

Overdraft Service : जर तुमचं बँकेत बचत खातं असेल तर तुम्हाला बँकेकडून अशी सेवा मिळते ज्याद्वारे तुमच्या पैशांची सहज व्यवस्था केली जाते आणि त्या बदल्यात तुमच्याकडून कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जात नाही. पाहा कोणती आहे ही सुविधा.

bank overdraft service loan with no processing fee or prepayment charge look at the features you will forget even about personal loans | असं लोन ज्यावर ना प्रोसेसिंग फी, ना प्रीपेमेंट चार्ज; फीचर्स पाहाल तर Personal Loan देखील विसराल

असं लोन ज्यावर ना प्रोसेसिंग फी, ना प्रीपेमेंट चार्ज; फीचर्स पाहाल तर Personal Loan देखील विसराल

Overdraft Service : आणीबाणीच्या परिस्थितीत पैशांची गरज भासल्यास एकतर क्रेडिट कार्डाचा वापर केला जातो, नाहीतर काही जण कोणाकडून तरी पैसे उधार घेणं किंवा पर्सनल लोनच्या पर्यायाचा वापर करतात. पण जर तुमचं बँकेत बचत खातं असेल तर तुम्हाला बँकेकडून अशी सेवा मिळते ज्याद्वारे तुमच्या पैशांची सहज व्यवस्था केली जाते आणि त्या बदल्यात तुमच्याकडून कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जात नाही. फीचर्सच्या बाबतीत ही सुविधा पर्सनल लोनपेक्षा अनेक अर्थांनी चांगली ठरू शकते. त्याबद्दल जाणून घेऊ.

काय आहे हा पर्याय?

आम्ही तुम्हाला बँकेकडून मिळणाऱ्या ओव्हरड्राफ्ट सुविधेबद्दल (ओडी) सांगत आहोत. ही एक आर्थिक सुविधा आहे, त्यासाठी तुम्हाला बँकेची मंजुरी घ्यावी लागते. जर तुम्हाला मंजुरी मिळाली तर तुम्ही तुमच्या बँक खात्यातून सध्याच्या बॅलन्सपेक्षा जास्त रक्कम काढू शकता.

ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय?

ओव्हरड्राफ्ट सुविधा हा एक प्रकारचा कर्जाचा प्रकार आहे. बहुतांश बँका करंट अकाऊंट, सॅलरी अकाऊंट आणि एफडीवर ही सुविधा देतात. ओव्हरड्राफ्ट सुविधेद्वारे घेतलेली रक्कम ठराविक कालावधीत परत करावी लागते. यावर व्याजाची गणना दैनंदिन आधारावर केली जाते.

रकमेची मर्यादा कशी ठरवली जाते?

ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेची मर्यादा किती असेल हे बँका ठरवतात. साधारणपणे तुम्ही सॅलरी अकाउंटवर ओव्हरड्राफ्टची सुविधा घेतल्यास पगाराच्या दुप्पट किंवा तिप्पट रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. परंतु सॅलरी अकाऊंटवर ओव्हरड्राफ्टची सुविधा ज्या बँकेत तुमचं खातं उघडले आहे तीच देऊ शकते.

पर्सनल लोन की ओव्हरड्राफ्ट सुविधा

सहसा पर्सनल लोन घेताना मंजूर झालेल्या संपूर्ण रकमेवर व्याजाची गणना केली जाते. परंतु ओव्हरड्राफ्टमध्ये तसं होत नाही. यामध्ये बँकेने मंजूर केलेल्या संपूर्ण रकमेवर व्याज भरावं लागत नाही. आपण आपल्या खात्यातून काढलेल्या रकमेवरच व्याज भरावं लागेल.

समजा ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत मिळालेल्या रकमेची मर्यादा बँकेनं दोन लाख निश्चित केली असेल आणि तुम्ही फक्त एक लाख रुपये वापरले असतील तर केवळ एक लाखावर व्याज आकारलं जाईल. पण जर तुम्ही २ लाखांचं पर्सनल लोन घेतलं असेल तर तुम्हाला पूर्ण २ लाखांनुसार त्यावर व्याज भरावं लागेल. याशिवाय ओडीमध्ये ज्या वेळेसाठी तुमच्याकडे रक्कम आहे, त्यासाठीच व्याज आकारलं जातं. म्हणजेच तुम्ही जितक्या लवकर कर्जाची परतफेड कराल, तितक्या लवकर या हप्त्यांमधून सुटका होईल.

प्रोसेसिंग शुल्क नाही

ओडीमध्ये कर्ज घेण्यासाठी प्रोसेसिंग फी वगैरे भरावी लागत नाही. तर प्रोसेसिंग फी पर्सनल लोन किंवा इतर कोणत्याही कर्जातही भरावी लागते. याशिवाय ओव्हरड्राफ्टचा एक फायदा म्हणजे कर्जाची लवकर परतफेड करण्यासाठी तुम्हाला प्रीपेमेंट चार्जेस वगैरे भरावे लागत नाहीत. तर पर्सनल लोन ठराविक वेळेपूर्वी बंद करता येत नाही. असं केल्यास त्यासाठी प्रीपेमेंट चार्ज द्यावा लागतो. 

ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी तुम्हाला तुमची एफडी, शेअर्स, घर, सॅलरी, इन्शुरन्स पॉलिसी, बॉण्ड्स इत्यादी तारण ठेवावं लागतात. जर आपण रक्कम फेडण्यास असमर्थ असाल तर त्याची भरपाई त्याद्वारे केली जाते. परंतु जर ओव्हरड्राफ्ट केलेली रक्कम आपण तारण ठेवलेल्याच्या रकमेपेक्षा जास्त असेल तर तारण ठेवलेल्याद्वारे भरपाई करून उर्वरित पैसे द्यावे लागतात.

Web Title: bank overdraft service loan with no processing fee or prepayment charge look at the features you will forget even about personal loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.